इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-दगदगीमुळे अशक्तपणा आहे:धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे

 दगदगीमुळे अशक्तपणा आहे: धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल; उद्या पर्यंत रिकव्हर होतील -पंकजा मुंडे



मुंबई-

      दगदगीमुळे अशक्तपणा आला आहे.उपचार सुरू आहेत.धनंजय मुंडे यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत.ते उद्या पर्यंत रिकव्हर होतील  अशी माहिती ना.धनंजय मुंडे यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

       राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाजप नेत्या पंकजा मुंडे  या देखील सकाळीच रुग्णालयात पोहचल्या आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यंनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांना भोवळ आली होती, विकनेस आला होता, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहोत, आम्ही त्यांना भेटलो, ते उद्यापर्यंत रिकव्हर होतील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

संबंधित बातम्या

Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*

Click:*दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* _मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट_

Click:पंकजाताई ,भुजबळ, शिंगणे, पेडणेकर आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!