MB NEWS-उद्या मिळणार पेन्शन: नगर परिषदे समोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखी हमीनंतर उपोषण मिटले

उद्या मिळणार पेन्शन: नगर परिषदे समोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखी हमीनंतर उपोषण मिटले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी यांची फेब्रुवारी व मार्चची पेन्शन मिळावी म्हणून 11 एप्रिल पासून नगरपरिषदे पुढे उपोषण सुरू केले होते.नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या दोन वेळेसच्या बोलणीत मार्ग निघू शकला नव्हता.त्यामुळे उपोषण सुरुच होते.आज दि.१२ रोजी न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मुख्याधिकारी मुंडे, संतोष रोडे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उद्या दि.१३ रोजी पेन्शचे पैसे देण्याची लेखी हमी दिली.त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

          सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पेन्शन व अन्य मागण्यांसाठी  नगर परिषद समोर उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर रास्त मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या दोन वेळेसच्या बोलणीत चर्चा झाली मात्र बोलणी फिसकटली होती.या उपोषणाला सेवानिवृत्त महिला कर्मचारी यांच्यासह ५०पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.आज यावर मार्ग काढण्यासाठी नप गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मुख्याधिकारी मुंडे, संतोष रोडे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उद्या दि.१३ रोजी पेन्शचे पैसे देण्याची लेखी हमी दिली.त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

           आंदोलन यशस्वी करण्यासाठी यासाठी संघटनेचे नेते नेते, प्रा.बी.जी.खाडे,किरण सावजी, जगन्नाथ शहाणे, शिवजी देशमुख, शंकर साळवे,नारायण भोसले, रमेश जगतकर,अर्जुन शिंदे, रहीम भाई, सय्यद ताहेर,शांता व्हावळे,अनुसया मस्के आदीसह नगर परिषद कर्मचारी युनीयनने मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !