MB NEWS-'हिंदू धर्माची मूळाक्षरे' या ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन*

 ⬛ *मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान* 



• _कृतार्थतेचे जीवन सर्वांनाच प्रेरणादायी-आ.हरिभाऊ बागडे_



• *संघ स्वयंसेवकाच्या कार्याचे प्रतिक म्हणजे वसंतराव गुरुजी - मधूभाई कुलकर्णी*



• _पथदर्शी कार्याचा आदर्श घालून देणारा जीवनवृतांत- डॉ. शरदराव हेबाळकर_



°  *'हिंदू धर्माची मूळाक्षरे' या ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत  प्रकाशन*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

        राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसे काम करतो, संघाच्या स्वयंसेवकांच्या कामाची उदाहरणे बघायची असतील वसंतराव देशमुख गुरुजींकडे पाहिले तरी स्पष्ट होईल.जीवनभर विधायक कार्याला वाहून घेत सजग समाजनिर्मितीत योगदान देण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे.हेच कार्य स्वयंसेवक करतात.संघ स्वयंसेवकाच्या कार्याचे प्रतिक म्हणजे वसंतराव गुरुजी होत असा गौरव संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मधूभाई कुलकर्णी यांनी केला.कृतार्थतेचे जीवन सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे असल्याचे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे यांनी केले.तर पथदर्शी कार्याचा आदर्श घालून देणारा जीवनवृतांत असल्याचे अ.भा इतिहास संकलन योजना राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शरदराव हेबाळकर यांनी सांगितले.



          परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील मुळ रहिवासी व संपूर्ण जीवनप्रवासात अनेक व्यक्ती, संस्था, परिवार, नातलग, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वृंद असा मोठा जनसंचय निर्माण करणारे वसंतराव देशमुख गुरुजी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभाचे आज (दि.१९ मे) रोजी आयोजन करण्यात आले होते.परळीतील अक्षदा मंगल कार्यालयात शानदार सोहळ्यात स्नेही जनांच्या उपस्थितीत वसंतराव देशमुख गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला.या निमित्त आण्णांनी लिहिलेल्या' हिंदू धर्माची मूळाक्षरे' या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या समारंभाला    मधूभाई कुलकर्णी(ज्येष्ठ प्रचारक रा. स्व. संघ),  माजी विधान सभा अध्यक्ष मा.आमदार हरिभाऊ बागडे,अ.भा इतिहास संकलन योजना राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. शरदराव हेबाळकर  उपस्थित होते. या समारंभात अनेक व्यक्ती, संस्था, परिवार, नातलग, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वृंद , मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून देशमुख गुरुजींचे सहकारी शिक्षक,माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परळीत मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.



             मान्यवरांच्या हस्ते व सर्वांच्या उपस्थितीत वसंतराव देशमुख गुरुजींचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे शब्दांकन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना वसंतराव देशमुख गुरुजी भावुक झाले.हजारो विद्यार्थी, जीवाभावाची माणसं आणि असंख्य हितचिंतक, स्नेही जनांच्या प्रेमाचा जीवनात लाभ मिळणारा मी खरा भाग्यवंत असल्याची कृतज्ञ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड.राजेश्वर देशमुख यांनी केले.तर उपस्थित सर्व मान्यवर, जेष्ठ यांचे स्वागत विलास देशमुख,विद्याधर देशमुख,अॅड.राजेश्वर देशमुख आदींनी केले.कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्रदर्शन सन्मान समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.






खालील ओळींवर क्लिक करा व वाचा 🔸👇👇👇👇

🔸 *MB NEWS* *DIGITAL PAGE*🔸 🏵️ *वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ* • _

वाचनिय विशेष लेख: संभाजी भणगे,संजय शिंदे, प्रमोद कुलकर्णी._ • *महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांचे शब्दांकन असलेले मानपत्र.* • _छायाचित्रे, बातमी, माहिती व बरेच काही._ 👇 *डिजिटल पेजला आवश्य भेट द्या...  


हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार