MB NEWS-परळीतील बरकतनगरचे बाप-लेक विहीरीत बुडाले !

 परळीतील बरकतनगरचे बाप-लेक विहीरीत बुडाले !



पाणी आणायला गेलेले वडील विहिरीत बुडाले त्यांना वाचवताना मुलगाही बुडाला;दुसर्‍या मुलाला आईने वाचवले

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     परळीतील बरकतनगरचे बाप-लेक विहीरीत बुडाल्याची घटना आज दि.१३ रोजी सायंकाळी ६ वा.सुमारास घडली आहे.पाणी आणण्यासाठी ते विहिरीवर गेले होते.पाणी आणायला गेलेले वडील विहिरीत पडले व बुडाले त्यांना वाचवताना त्यांचाज्ञएक मुलगाही बुडाला.दुसर्‍या मुलाने या दोघांना वाचवण्यासाठी उडी घेतली असताना तोही बुडत होता यादरम्यान त्याच्या आईने दोरी फेकून त्यास वाचवले आहे.अतिशय ह्रदयद्रावक ही घटना घडली आहे.



          आज दि.१३ रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस स्टेशन परळी ग्रामीण हद्दीतील दादाहरी वडगाव शिवारातील  शेतकरी नावे 1. शेख सादिक शेख हमीद वय 58 वर्षे राहणार बरकत नगर परळी हे शेजारी नातेवाईक नामे शहादत पठाण राहणार वडगाव यांचे विहिरीवर पाणी घेणे कामी गेले असता पाय घसरुन विहीरीत पडले . त्यांना काढण्यासाठी त्यांचा मुलगा शेख रफिक शेख सादीक वय 25 वर्षे याने विहिरीत उडी मारली व एकमेकाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही बुडाले. दोघाला वाचवण्यासाठी तिसरा मुलगा नामे शेख साजिद शेख सादिक वय तीस वर्ष हा विहिरीत उतरला परंतु तोही बुडत असल्याने आई शेख शौकत शेख सादिक हिने दावी टाकून हाताला धरून तिसऱ्याला वाचवले. दोघेही सध्या विहिरीच्या तळाशी आहेत. बाहेर काढण्यासाठी पोलिस स्टाफ, गावकरी व इतर जन शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी मारोती मुंडे व पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार