MB NEWS-मान्सुनपुर्व सफाईची कामे तातडीने करा-अश्विन मोगरकर

 मान्सुनपुर्व सफाईची कामे तातडीने करा-अश्विन मोगरकर



परळी वैजनाथ....

पावसाळा जवळ आला तरी अजूनही परळी शहरातील सरस्वती नदी तसेच इतर छोट्या मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई नगर परिषदने त्वरित करावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाऊस झाल्यास नाले सफाई न केल्यामुळे घर दुकानात पाणी घुसून नागरिकांचे व व्यावसायिकांचे वित्तीय नुकसान होऊ शकते. शहरात नगर परिषदेचे कायम स्वरूपी स्वच्छता कर्मचारी आहेत सोबतच दर महिन्याला लाखों रुपयांचे शहर स्वच्छतेसाठी खाजगी कंत्राट दिलेले आहे तरीही शहरात स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहेत. शहरातील दैनंदिन स्वच्छता व्यवस्था कोलमडून गेलेली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. नाल्या तुंबलेल्या आहेत. रस्त्यावर धुळीचे थरावर थर जमा होत आहेत. यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

मोठा पाऊस झाला तर जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता आहे. याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल. सध्या नगर परिषदेवर प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी यांनी शहरात फिरून नागरी समस्यांची स्वतः पाहणी करावी तसेच त्वरित मान्सूनपूर्व नालेसफाई केली जावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !