MB NEWS-पट्टिवडगाव घटनेतील आरोपीच्या केज तालुक्यातुन पोलीसांनी बांधल्या मुसक्या

 पट्टिवडगाव घटनेतील आरोपीच्या केज तालुक्यातुन  पोलीसांनी बांधल्या मुसक्या


 


अंबाजोगाई, प्रतिनिधी....

       गावातीलच  रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून एका १७ वर्षिय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली.याप्रकरणी 'त्या' रोडरोमिओ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाला आरोपीच्या अटकेबाबत निर्देश दिले होते. या प्रकरणातील आरोपी शोधून पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.   


         बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १०) अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली होती. गावातीलच एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर  गुन्हा नोंदवण्यात आला. घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपी फरार झाला होता. या घटनेचे गांभीर्य व सर्वस्तरातून व्यक्त होणारा रोष लक्षात घेता पोलीस वेगाने आरोपीचा शोध घेत होते. हा आरोपी लाडेगाव ता.केज येथून पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती बर्दापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अशोक खरात यांनी दिली आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

          

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


*स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*


🛑 *परळीकरांनी वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील भगवान नृसिंह मंदिरात केला जन्मोत्सव;दर्शनाला गर्दी.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

टिप्पण्या

  1. फाशी किंवा आजीवन कारावास ची शिक्षा ठोठावा या नालयका ल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार