MB NEWS-पट्टीवडगाव प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा - धनंजय मुंडेंचे एसपीना निर्देश

 पट्टीवडगाव प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा - धनंजय मुंडेंचे एसपीना निर्देश



संबंधित घटनेतील दोषीवर कडक कार्यवाही होणार - धनंजय मुंडे


मुंबई (दि. 13) - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटनेत एका युवतीने आत्महत्या केली असून, या प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. 


पट्टीवडगाव येथील एका महाविद्यालयीन तरुणीने एका शेजारील मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त समजले असून, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. 


या पद्धतीची प्रकरणे बीड जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाहीत, संबंधित घटनेची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर केली जाणार नाही. सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर शासन केले जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार