MB NEWS-आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

 आनंदवार्ता:परळीत  तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !



परळी वैजनाथ :-

मुंबई उच्च न्यायालयाने एक वार्षिक बदल्याचे परिपत्रक काढून परळी येथे तिसऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती केल्याने आता तिसरे न्यायालय सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की यापूर्वी परळी येथे दोन न्यायाधीश कार्यरत होते व दोन न्यायालये चालू आहेत. परळी न्यायालयातील प्रकरणांची संख्या वाढल्यामुळे अतिरिक्त न्यायालयाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने तिसऱ्या न्यायालयाची निर्मिती केली आहे. बीड येथून श्रीमती ए ए  पाटील या दुसरे सह दिवाणी न्यायाधीश म्हणून परळी येथे येणार आहेत. अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक झाल्यामुळे परळी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल. तसेच अपंगासाठी स्वतंत्र कोर्ट इमारत तयार असून त्याबाबतही स्वतंत्र अपंगाचे न्यायालय होणार आहे.त्यामुळे आणखी न्यायालयाची भर पडणार आहे. परळी येथे न्यायदान करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.त्यामुळे नविन व अद्ययावत इमारतीच्या बांधकामाबाबत परळी वकील संघाने पाठपुरावा सुरू केला आहे.अतिरिक्त न्यायालयाने येत असल्याने पक्षकारांना लवकर व जलद न्याय मिळेल व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल असा विश्वास परळी येथील जेष्ठ विधिज्ञ अँड.आर.व्हि.गित्ते यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !