MB NEWS-*धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या शो ची परळी येथे फटाके फोडून स्वागत*

 धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे... चित्रपटाचे परळीत जोरदार स्वागत



 फटाके फोडून शोचा परळीत शुभारंभ 

 धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सुपरहिट चित्रपटाचे परळी वैजनाथ येथे शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य  अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले.

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांचा जीवनावरती आधारीत वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि  शिवसेने वरती असलेल्या निष्ठेचे दर्शन घडवणारा  चित्रपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सुपरहिट मराठी चित्रपटाची महाराष्ट्रातील शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत होते.  तो चित्रपट  दिनांक 13 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला असून परळी वैजनाथ येथे शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य  अभयकुमार उर्फ पप्पू  ठक्कर,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून  पहिल्या शोची सुरुवात करत 

जय भवानी जय शिवाजी शिवाजी, शिवसेनाप्रमुख वंदनीय  बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,  धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे , उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.यावेळी युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, उपशहरप्रमुख किशन बुंदेले, अभिजित देशमुख,माजी नगरसेवक संजय कुकडे, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभागप्रमुख संजय सोमाने, शिवाजीनगर विभाग  प्रमुख सुरेश परदेशी,आमित कचरे,गजानन कोकीळ,बाळासाहेब सातपुते, नवनाथ  वरवटकर, शिवम मोहिते, दिपक जोशी, माऊली मुंडे, वैजनाथ आचार्य, बजरंग औटी, योगेश घेवारे, सचिन दराडे, पापा सिंग ठाकूर, अंबर सारडा, श्रेयश कराड, मंगेश गुजर, नवल वर्मा त्यांच्यासह  शेकडो शिवसैनिक व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या वरती प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार