MB NEWS-सय्यद अलाऊद्दीन सामाजिक कार्याबरोबरच बांधकाम व्यवसायातही अग्रेसर - श्री कराड

 सय्यद अलाऊद्दीन सामाजिक कार्याबरोबरच बांधकाम व्यवसायातही अग्रेसर - श्री कराड



परळी वैजनाथ दि २० ( प्रतिनिधी ) :- कार्य कोणतेही असो धार्मिक सामाजिक यामध्ये स्वताहून वाहून घेणारे सय्यद अलाउद्दीन नसीर हे बांधकाम व्यवसायातही अग्रेसर आहेत यांच्यामुळे अनेक गोरगरिबांना रोजगार उपलब्ध होत असून अनेकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन  श्री वाल्मिकअण्णा कराड यांनी केले.

       शहरातील मध्यवर्ती भागातील अरुणोदय मार्केट या ठिकाणी सय्यद अलाऊद्दीन नसीर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री कराड आणि सिद्धार्थ कोळी यांच्या हस्ते आणि परळी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, दैनिक लोकाशाचे तालुका प्रतिनिधी दिलीप बद्दर, राजाखां गुत्तेदार, शंकर कापसे, जालिंदर नाईकवाडे यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की सय्यद अलाऊद्दीन यांनी कधीच पैशाला किंमत दिली नाही सामाजिक कार्य नेहमीच करीत राहणे असा त्यांचा पवित्रा राहिलेला आहे सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी दर्जेदार बांधकाम व्यवसाय देखील आगेकूच केली आहे त्यांची ही घोडदौड अशीच सुरू राहिली असे सांगून श्री कराड यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सय्यद नसीरसाहब, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अनंत इंगळे, अल्ताफ पठाण, रवी मुळे, महादेव रोडे, गिरिष भोसले, सामाजिक कार्यकर्ते अमित घाडगे, नगरसेवक शेख शमू, युनुस डिघोळकर, शेख माजिद युनुस, शेख युसुफ शेख साजिद,  शैलेश पांडकर, सय्यद बशीरभाई, पांडुरंग इंगळे, हनुमंत इंगळे, अशोक इंगळे, माऊली फड, भूराज बदने, राधाकिशन दराडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपणास आजतागायत उपस्थित सर्वांनी सामाजिक कार्यात आणि व्यवसायात भरभरून सहकार्य करून मार्गदर्शन केले आहे असेच प्रेम यापुढेही कायम ठेवावे असे भावनिक विचार सामाजिक कार्यकर्ते तथा ए एम कन्स्ट्रक्शनचे संचालक सय्यद अलाउद्दीन नशिर यांनी केले. शेवटी सय्यद शहाजान नशीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार