MB NEWS-दक्षिण सोलापुरातील गोकुळ शुगर्सच्या गळीत हंगामाचा मुंडेंच्या हस्ते समारोप*

 ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे



*पश्चिम महाराष्ट्रातील गळीत हंगाम संपलेल्या साखर कारखान्यांनी आपल्याकडील हार्वेस्टर व यंत्रणा मराठवाड्यात द्यावी - धनंजय मुंडे यांचे आवाहन*



*दक्षिण सोलापुरातील गोकुळ शुगर्सच्या गळीत हंगामाचा मुंडेंच्या हस्ते समारोप*


सोलापूर (दि. 21) - दिवस-रात्र, ऊन-वारा-पाऊस या सर्व बाबींची तमा न बाळगता ऊस तोडणीचे काम ऊसतोड बांधव करतात, त्यांना अपार कष्ट करावे लागतात; त्यांचे हे श्रम व वेळेची बचत व्हावी, कमी वेळेत अधिक ऊस तोडल्याने त्यांना मिळणारा मोबदला देखील अधिक मिळेल, या दृष्टीने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारा कोयता अस्तित्वात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 



दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर्स साखर कारखान्याच्या गळीत हंगाम समारोप प्रसंगी आयोजित कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. 


साखर कारखाना हंगामाच्या समारोपास प्रथमच आपण शुभेच्छा देत असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी या वर्षी मराठवाड्यातील ऊस मोठ्या प्रमाणात आणून गाळप केला, त्याबद्दल त्या सर्व कारखान्यांचे आभार मानले. 


मराठवाड्यात यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी मराठवाड्यातून ऊस आणला, आता ज्या कारखान्यांचे गळीत हंगाम संपले आहेत, त्यांनी त्यांच्याकडे असलेले हार्वेस्टर व अन्य यंत्रणा मराठवाड्यातील कारखान्याकडे पाठवाव्यात, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. 


उघड्या आकाशाखाली आपल्या शेतीचा व्यवसाय मांडणारी शेतकऱ्याची जमात आहे, राज्य सरकारने कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, अतिवृष्टी मध्ये मदत असे वेळोवेळी शेतकऱ्याला संकट काळात सावरले असल्याचे सांगताना धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारच्या महागाई बाबतच्या निष्क्रियतेवरही टीका केली. 


केंद्रातील सरकार व त्यांचा पक्ष महागाई वरून सर्व सामान्य माणसाचे लक्ष विचलित व्हावे व त्यांचे सरकार नसलेल्या राज्यातील सरकार अस्थिर व्हावे या उद्देशाने जाणीवपूर्वक धार्मिक विषयातून वादंग निर्माण करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. 


दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर्स या साखर कारखान्याचा गळीत हंगाम समारोप व कृषी प्रदर्शन संपन्न झाले, यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आ. संजय मामा शिंदे, आ. दीपक साळुंखे, लोकेनेते शुगर्सचे चेअरमन बाळराजे पाटील, गोकुळ शुगर्स चे चेअरमन दत्ता शिंदे, संतोष पवार यांसह आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार