MB NEWS-वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

 वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक




परळी वैजनाथ(प्रतिनिधी) दि.२० - 'नीट' परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ असे आमिष दाखवून दोन भामट्यांनी तिच्या पालकांकडून १४ लाख रुपये उकळले. मात्र, नंतर महाविद्यालयात प्रवेशही मिळवून दिला नाही आणि रक्कम परत करण्यासही नकार दिल्याच्या आरोपावरून त्या दोन भामट्यांवर परळीच्या


संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी मनीषा नंदकुमार फड (रा. माधवबाग, परळी) यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. सदर फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी गतवर्षी नीट परिक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या वैद्यकीय प्रवेशासाठी कुटुंबीय प्रयत्नात होते. त्या दरम्यान मनीषा यांचे दिर सुनील श्रीरंग फड यांना युवराज सिंग उर्फ सोनू कुमार आणि नितांत गायकवाड (रा. पुणे) या दोघांनी कॉल केला आणि पुण्यात त्यांची कन्सलटन्सी असल्याचे सांगितले. 


नीट परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही पोंडीचेरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ. त्यासाठी पाच वर्षाच्या खर्चासह ७५ लाख रुपये लागतील असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फड यांनी मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे आणि पहिल्या टप्प्यातील मागणीनुसार एकूण १४ लाख रुपये त्यांना ८ फेब्रुवारी रोजी पाठविले. त्यानंतर २२ मार्च रोजी आणखी ५ लाख रुपये त्या दोघांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये नेऊन दिले.


नंतर तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे म्हणून त्यांनी फड कुटुंबियांना पोंडीचेरी येथे बोलावून घेतले. मात्र, तिथे गेल्यानंतर युवराज सिंग याने या कॉलेजचे प्रवेश बंद झाले आहेत असे सांगून इतर कॉलेजमध्ये प्रवेश देतो अशी बतावणी करू लागला. त्याच्या अविर्भावावरून तो फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्याने फड यांनी आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही, आमचे पैसे परत कर असे त्याला सांगितले. 


त्यानंतर युवराज सिंगने पाच लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १४ लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून अद्यापही त्याने ती रक्कम परत केली नाही. अखेर हताश झालेल्या मनीषा फड यांनी पोलीसात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून युवराज सिंग आणि नितांत गायकवाड या दोघांवर संभाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !