MB NEWS-६ लाख ७० हजार नगदी रकमेसह साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त

 पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी



६ लाख ७०  हजार नगदी रकमेसह साडे पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त 


२९ आरोपी ताब्यात ३६ जणांवर कारवाई



बीड:- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक एम मलिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशा वरून उस्मानाबाद येथे अवैद्य जुगार मटका आणि गुटक्यावर ११ अड्ड्यावर कार्यवाही ३६ जणांच्या विरुद्ध कार्यवाही करीत १५ लाख ४९ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेत मोठी कार्यवाही केली असल्याने आता पंकज कुमावत यांचा आता औरंगाबाद विभागात दरारा निर्माण झाला आहे.


या बाबतची माहिती अशी की, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशावरून उपविभाग केज उपविभागचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांचे सोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे, दिगंबर गिरी, शामराव खणपटे, रशीद शेख, मंगेश भोले, रामहरी भंडाणे, संजय टुले, सत्यप्रेम मिसाळ, आरसीपी पथकाचे जवान, वाहन चालक इनामदार व अंगरक्षक भुंबे यांच्या पथकाने उस्मानाबाद शहरातील ११ ठिकाणी अवैद्य धंदे आणि जुगार अड्ड्यावर कार्यवाही केली. यात शहर पोलीस ठाणे हद्दीत मार्केट यार्ड सोलापूर रोड अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्डा, शिवाजी चौक दीपक फुल स्टॉल शेजारी चपने कॉम्प्लेक्स मधील ऑनलाइन जुगार अड्डा, हॉटेल नाज शेजारी ऑनलाइन जुगार अड्डा, हॉटेल लजीज शेजारील ऑनलाईन जुगार अड्डा, नाज होटेल शेजारी पाथरूड गल्लीतील ऑनलाईन जुगार अड्डा, आडत लाईन समोरील टपरी मधील कल्याण मटका जुगार अड्डा आणि साईबाबा ट्रेडर्स  येथे छापा मारून गोवा गुटख्याचा माल; अशा सात ठिकाणी छापा मारला. तसेच 

आंनद नगर पोलीस ठाणे हद्दीतील

सूर्या बिर्याणी हाऊस दुकानातील बिंगो जुगार गेम, नितीन ऑनलाईन लॉटरी जुगार अड्डा, अंबिका ऑनलाईन लॉटरी, हरमन चहा टपरीचे बाजूला मिलन नाईट जुगार अड्डा या चार ठिकाणी असे एकूण ११ ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाडी टाकल्या यात ६ लाख ७० हजार रु. सह एकूण १५ लाख ४९ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 

धाडीत २९ आरोपी ताब्यात घेतले असून ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कार्यवाहिमुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग व पोलीस पथकाचा उस्मानाबाद जिल्ह्यात अवैद्य धंदे करणावर धाक निर्माण झाला आहे.

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार