MB NEWS-राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त थर्मल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

 स्पर्धेच्या माध्यमातून  सांघिक भावना वृध्दिंगत करणाचा प्रयत्न -मुख्य अभियंता मोहन आव्हाड

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त थर्मल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन


परळी ( प्रतिनीधी)


वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांच्यातील सांघिक भावना वृध्दिंगत करणाचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे  मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ व्या जयंती निमित्त औष्णिक वीज केंद्र येथे डे नाईट क्रिकेट लीग सामन्याचे प्रसंगी केले.

राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन करून  मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून भांडार उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार चा उद्घोष यावेळी करण्यात आला.  विचारमंचावर उपमुख्य अभियंता श्याम राठोड आणि अवचार,डी जि इंगळे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, हरिभाऊ मैंदाड, जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता अरविंद येळे, सचिव विशाल गिरे, मदन बिडगर आदी उपस्थित होते.



        थर्मल कॉलनी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, राष्ट्रसंत भगवानबाबा, महात्मा बसवण्णा व राजमाता अहिल्यादेवी होळकर या  महापुरुषांच्या जयंत्या निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करून मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या संकल्पनेतून होत आहेत. यामुळे अधिकारी कर्मचारयांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे. ज्या मुळे टीम वर्क चे महत्व विशद होत आहे. प्रत्येकामध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी जागरूकता निर्माण झाली आहे. 



या स्पर्धेत १३ संघाने सहभाग नोंदवला आहे. दि १८ मे रोजी स्थापत्य कॉलनी विरुद्ध टाइम ऑफिस ओ एस असा सामना होता. हा सामना टाइम ऑफिस ने जिंकला. मॅन ऑफ द मॅच राहुल जाधव हे मानकरी ठरले एका एकी झुंज देणारे आर सी देवांग याने ३० चेंडूत ४० धावा काढल्या. या सामन्याचे उत्कृष्ठ समालोचक जयवर्धन सूर्यवंशी हे होते. डी. एन देवकते, अरुण गित्ते,  सुधीर मुंडे, वैजनाथ चाटे, बी एल वडमारे, माऊली फड, अंकुश जाधव, मनोज जाधव, राहुल बनसोडे, अभियंता कोकाटे, इंजिनीरिंग सोसायटी चे अध्यक्ष शाहू येवते, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट  के एस तूपसागर,  धनंजय बिडगर, रघुनाथ बिडगर, अरुण चाटे, सुर्यकांत मदने, विकास जाधव, बालाजी फड, चंद्रकात कोव्हाळे, ज्ञानेश्वर बिडगर, प्रकाश थोरात, जनार्धन थोरात, बालाजी गित्ते, वामन शेंडगे, बाळासाहेब सरवदे, शंकर नागरगोजे, पप्पु नागरगोजे ,सखाराम बिडगर, कार्यकारी अभियंता बी एम सिरसाट ,दत्तात्रे बंडे, सोपान चौधर, बालासाहेब बिडगर, विजय गुट्टे, अजित गुट्टे, अभिजित बिडगर, हनुमान बिडगर, ज्ञानेश्वर हरणावळ,   अभिमन्यू भिसे, राजेभाऊ गजले, अमर ढोबळे,सचिन शिंदे,  चेतन रणदिवे, संदीप पाटील, संदीप काळे, सुनील नागरगोजेआदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !