MB NEWS-......हा तर श्रद्धेचे दमन व भक्तीभेदाचा डाव - भाविकांत नाराजीचा सूर

 या वर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीला भाविक मुकणार; संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट!



🔸 हा तर श्रद्धेचे दमन व भक्तीभेदाचा डाव - भाविकांत नाराजीचा सूर


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा पंढरपूर आषाढी वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा दरवर्षी परळीत येतो. या दोन दिवसात परळीचे वातावरण अतिशय भक्तीमय असते.परंतु या भक्तीत भेद निर्माण होण्याची चिन्हे यावर्षी दिसून येत आहेत.यावर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीला भाविक मुकणार असे चित्र दिसत आहे.संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट रचला जात असुन याबाबत परळीकर भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

       


        शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा पंढरपूर आषाढी वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा परळीत आल्यानंतर वर्षानुवर्षे भाविक भक्तांकडून मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने स्वागत केले जाते. राणी लक्ष्मीबाई टॉवर- गणेश पार रोड -गणेशपार- नांदूरवेस- मार्गे नेहरू चौक- संत जगमित्र नागा मंदिर अशा प्रकारची नगरप्रदक्षिणा करून हा पालखी सोहळा मार्गक्रमण करतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही धार्मिक परंपरा बनलेली आहे. दरवर्षी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे परळी शहरात जोरदार स्वागत होते. परळीच्या सीमेपासूनच या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भाविक मनोभावे तयारी करतात. शक्तीकुंज वसाहतीतील मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा पालखी सोहळा गावातून मार्गक्रमण करतो. जुन्या गाव भागात या पालखी सोहळ्याचा एक वेगळाच धार्मिक महोत्सव साजरा केला जातो. ठिक ठिकाणी भाविक सडा- रांगोळ्या, ओवाळणी अशा मंगलमय वातावरणामध्ये भक्तिरसात रममाण होतात. गजानन महाराज पालखी येण्यापूर्वी आठ दिवसापासून भाविक भक्त पालखीची वाट बघतात व स्वागताचे नियोजन करतात. संत गजानन महाराज पालखी सह अन्य पालख्या व दिंड्याही याच मार्गावरून नगर प्रदक्षिणा करतात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा खंडित करण्याचा चुकीचा घाट घातला जात आहे. शक्तीकुंज वसाहतीतून पालखी सोहळा शहरात आल्यानंतर परंपरेप्रमाणे जुन्या गाव भागातून पालखी सोहळा न नेता राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून थेट संत जगमित्र नागा मंदिर पर्यंत हा पालखी सोहळा घेऊन जाण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे एक प्रकारचे धार्मिक दमन असून लोकांच्या धार्मिक श्रद्धेला घाला घालण्याचे षड्यंत्र काही मूठभर लोक आखताना दिसत आहेत. 

            याबाबत संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे नियोजनकर्ते परळी शहरात काही दिवसापूर्वी आले होते. त्यांनी बोटावर मोजण्या एवढ्या लोकांशी भेटून पालखी मार्ग यावर्षीपासून बदलत असल्याचे सुचित केले. परळीत ज्या लोकांना यासंदर्भात संस्थांनचे लोक येऊन भेटले त्या परळीकरांनीही याबाबत कोणताही खोलवर विचार न करता या नियोजनाला मूकसंमती दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावर्षीपासून परंपरेने चालत आलेल्या पालखी मार्गावरून संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळा येणार नसल्याबाबत मुद्दा समोर आला आहे. याविषयी तमाम परळीकर भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून संस्थांनशी याबाबत चर्चा करून व भाविकांच्या भावना कळवून पूर्वापार चालत आलेला पालखी मार्ग कायम ठेवण्याबाबत प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे. 

            पालखी मार्ग बदलणे बाबत संस्थांनचे  लोक परळीत आले  असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा मार्ग बदलला जाऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेत परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी , माजी नगरसेवक राजेंद्र सोनी,शिवसेनेचे रमेश चौंडे व अन्य काही जबाबदार नागरिकांनी या लोकांची भेट घेऊन पालखी मार्ग बदलण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. पूर्वापार चालत आलेला पालखी मार्ग कायम ठेवून भाविकांच्या श्रद्धेला व भावभक्ती ला प्राधान्य द्यावे अशा प्रकारची भूमिका मांडली मात्र संस्थांनच्या नियोजनकर्त्यांनी याबाबत असमर्थता दर्शविली असून पालखी मार्ग बदलणारच असल्याचे सांगितले.  दरम्यान संत गजानन महाराज पालखी सोहळा आणि परळीतील भाविकांचे एक वर्षानुवर्षाचे जिव्हाळ्याचे भावबंध निर्माण झालेले आहेत. आपल्या दारात पालखीच येणार नाही या विचाराने भाविक मनोमन हवालदिल झाले आहेत. हा पालखी सोहळा पूर्वापार मार्गावरूनच जावा व आपल्या दारात संत पूजा घडावी, दर्शन घडावे अशी प्रामाणिक श्रद्धा सर्वसामान्य भाविकांची आहे. याबाबत संस्थानला भाविकांच्या या भावना कळविणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संस्थांननेही भाविकांच्या श्रद्धेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेऊन पुर्वापार चालत आलेल्या नगरप्रदक्षिणा मार्गावरूनच कायम हा पालखी सोहळा मार्गक्रमण करत राहावा अशी मागणी परळीकर भाविकांनी केले आहे.     

 • परळीकरांच्या भावना संस्थानपर्यंत पोहचविण्यासाठी चळवळ उभी करण्याची नितांत गरज........

      दरम्यान,संत गजानन महाराज संस्थानने हा निर्णय अंतिम करण्यापुर्वीच परळीकर भाविकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.यासाठी अधिकाधिक प्रमाणात लोकभावना संबंधितांपर्यंत गेली पाहिजे.यासाठी चळवळ उभी करण्याची नितांत आवश्यकता आहे.   

 • अभी नही तो कभी नहीं.......

         भाविकांच्या श्रद्धेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेऊन पुर्वापार चालत आलेल्या नगरप्रदक्षिणा मार्गावरूनच कायम हा पालखी सोहळा मार्गक्रमण करत राहावा अशी मागणी आत्ताच करुन मार्ग बदलण्याचा घातलेला घाट रद्द करण्याबाबत हालचाली वेगात कराव्या लागणार असुन याबाबत जर काहीच केले नाही तर निश्चितच हा पालखी मार्ग बदलला जाणे जवळपास निश्चित झालेले आहे.त्यामुळे या आस्थेच्या मुद्यावर अभी नही तो कभी नहीं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

• वैद्यनाथाची नगरी व नगरप्रदक्षिणेला महत्त्व......

        दरवर्षी आषाढी वारीसाठी विदर्भ , मराठवाडा भागातील अनेक दिंड्या परळी मार्गे मार्गस्थ होतात.पंढरपूरच्या वारी मार्गा वरील बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पुनीत झालेले परळी हे हरी-हर ऐक्य क्षेत्र असल्याने वारकरी बंधावात याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याचबरोबर संत जगमित्रनागा महाराजांचीही येथेच समाधी असून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे परळीत येणाऱ्या दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात. अन्यत्र वारीमार्गावर कोणत्याच ठिकाणी नगरप्रदक्षिणा केली जात नाही.परळी व त्यानंतर पंढरपूर याठिकाणी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. एवढी धार्मिक व जाज्वल्य परंपरा मोडीत निघण्याची शक्यता आहे.त्यामुळे आपलं शहर -आपली परंपरा जपण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे.

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !