MB NEWS-धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान

 धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान



*दर रविवारी विविध वॉर्डातील जनतेशी साधणार संवाद, राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी अभियान देखील राबविले जाणार*


परळी (दि. 21) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहरात रविवारपासून (दि. 22) 'राष्ट्रवादी आपल्या दारी' या अभियानास सुरुवात करण्यात येत असून, याअंतर्गत धनंजय मुंडे हे पदाधिकाऱ्यांसह परळी शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 


रविवारी (दि. 22) सकाळी 7 वा. शहरातील वॉर्ड क्र. 1 (बरकत नगर) भागातून या अभियानास सुरुवात करण्यात येईल. यावेळी धनंजय मुंडे हे स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य नोंदणी अभियान देखील राबविण्यात येणार आहे. 


परळी शहरातील नागरिकांनी माझ्या राजकीय जडणघडणीत मोलाचे सहकार्य केलेले आहे. विधानसभा निवडणुकीत मला तब्बल 20 हजारांचे मताधिक्य शहराने दिलेले आहे. कोविड काळात आम्ही लोकांची सेवाधर्म च्या माध्यमातून सेवा केली, मात्र निर्बंधांमुळे संवाद काही प्रमाणात कमी झाला होता, त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून परळी शहरातील नागरिकांशी आपले नाते अधिक घट्ट करण्याचे उद्दिष्ट या अभियानामागे असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


दरम्यान उद्या (रविवार) सकाळी 7 वा. वॉर्ड क्रमांक एक मधील बरकत नगर भागातून या अभियानास सुरुवात होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी आदींनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहरच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार