MB NEWS- ह.भ.प.वै. उत्तम महाराज उखळीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवशिय किर्तन महोत्सव

 ह.भ.प.वै. उत्तम महाराज उखळीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवशिय किर्तन महोत्सव 



परळी वैजनाथ प्रतिनिधी.... 

       परळी पंचक्रोशी तसेच परभणी,बीड जिल्हा व आळंदी-पंढरपुरसह संपूर्ण वारकरी विश्वात आदरणीय व सर्व परिचित असलेल्या संत सोपानकाका महाराज उखळीकर भजनी फडाचे प्रमुख हभप वैै.गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवशिय किर्तन महोत्सव  आयोजित करण्यात आला आहे.

    हभप वैै.गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त परळी येथील संत सोपानकाका महाराज मंदिर (उखळीकर भजनी फड) येथे दि.१५,१६ व १७ मे या तीन दिवशिय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस सकाळसत्र  व संध्याकाळ अशा दोन सत्रात महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार किर्तनसेवा करणार आहेत.दि.१५ मे रोजी  दुपारी १२ ते २  संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप बापुसाहेब महाराज मोरे देहूकर, रात्री ८ ते १० ह.भ.प.व्याकरणाचार्यअर्जुन महाराज लाड गुरुजी, दि.१६ मे रोजी दुपारी १२ ते २  तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू चे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले,रात्री ८ ते १०ह.भ.प. वेदांताचार्य प्रल्हाद महाराज  दैठणकर, दि.१७ मे रोजी दुपारी १२ ते २ हभप गाथामुर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन व दुपारी २ते३ चाकरवाडी संस्थानचे प.पु.महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे आशिर्वचन होणार आहे.

       या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, गुणवान,भजनी मंडळ,गायक, वादक, भाविक यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच वारकरी संप्रदायातील किर्तनकार, प्रवचनकार यांची उपस्थिती राहणार आहे.परळी व पंचक्रोशीतील विविध गावचे गावकरी,उखळीकर फडावरील भजनी मंडळ, भाविक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीगुरु सोपानकाका महाराज मंदिर उखळीकर भजनी फडाच्या वतीने गं.भा. इंदबाई उत्तम महाराज ननवरे, केशव पंढरीनाथ महाराज ननवरे श्री विठ्ठल उत्तम महाराज ननवरे श्री विश्वंभर उत्तम महाराज ननवरे श्री दिनानाथ उत्तम महाराज ननवरे  व समस्त उखळीकर फडावरील भजनी मंडळ यांनी केले आहे.




 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !