MB NEWS-परळी वकील संघाचे उपोषण 15 ऑगस्टपर्यंत तुर्त स्थगित !

 परळी वकील संघाचे उपोषण 15 ऑगस्टपर्यंत तुर्त स्थगित !







परळी वैजनाथ :- 

परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांची मराठवाडा बाहेर तात्काळ बदली करा अशी आक्रमक मागणी परळी वकील संघाने मुख्यमंत्र्याकडे केली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार येईपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे . याबाबत परळी वकील संघाचे शिष्टमंडळाने आज उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन उपोषणास परवानगी मागितली होती.उपविभागीय अधिकारी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा चालू असुन तुर्तास उपोषण न करण्याबाबत विनंती केली .त्यामुळे दिनांक १ जुलै पासून होणारे परळी वकील संघाचे उपोषण पंधरा ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की परळी न्यायालयामध्ये होणारे कोर्ट डिग्री प्रकरण यांच्या आधारे फेरफार मंजूर करण्यास अनेक तलाठी व मंडळ अधिकारी हे नकार देत आहेत व त्यावर बीड येथे जाऊन मुद्रांक शुल्क भरा असे सांगत आहेत. तसेच नायब तहसीलदार हे सांगत आहेत असे सांगत होते. जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश जारी केल्यामुळे व सरकारच्या राजकीय अस्थिरतेमुळे तुर्तास उपोषण पंधरा ऑगस्ट 2022 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

अशी माहिती परळी वकील संघाचे अध्यक्ष अँड पी एम सातभाई व सचिव उषा दौंड यांनी दिली.यावेळी परळी वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्री. अँड वैजनाथ नागरगोजे,अँड अनिल मुंढे अँड.प्रकाश मराठे, अँड.डि.एल.उजगरे, अँड .एच.व्ही.गुटटे, अँड वसंतराव फड अँड मिर्झा मंजुर अली अँड.राजेश नागापूरकर अँड. आर.व्ही.गित्ते, ॲड वाय आर सय्यद,अँड श्रीकांत कराड अँड लक्षमण अघाव, अँड. सुनील सोनपीर, अँड विलास बडे अँड धनाजी कांबळे, अँड डि पी कडबाने अँड.व्हि डी धुमाळ अँड.जे एस मुंडे, अँड.पोतदार, अँड शशीकांत चौधरी अॅड.लक्ष्मीकांत मुंडे, अँड शरद सातभाई, अँड आबा सोळंके अँड.शाकिर सय्यद, अँड शेख इजाज. अँड संजय शेटे अँड .दस्तगिर शेख अँड.राहुल सोळंके, अँड अर्जुन सौळंके अँड.शेख शफीक, अँड.प्रविण फड अँड.इरफान खान अँड.केशव अघाव,अँड.रूद्र कराड, अँड.बालाजी कराड ईत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार