MB NEWS-आकस्मिक निधन: जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांची आत्महत्या; परळीच्या पत्रकारिता क्षेत्रातून शोकसंवेदना

 ⚫️ आकस्मिक निधन: जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांची आत्महत्या; परळीच्या पत्रकारिता क्षेत्रातून शोकसंवेदना


परळी वैजनाथ..... येथील ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांचे आकस्मिक निधन झाले. बर्‍याच दिवसांपासून प्रेमनाथ कदम हे आजारी होते.काल दि.१४ रोजी राहत्या घरी गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.त्यांच्या निधनाने परळीतील पत्रकारिता क्षेत्रात शोकसंवेदना व्यक्त केली जात आहे.


       जिल्ह्यात सायकल फेरी काढून एड्स जनजागृती करणारा सच्चा मित्र, बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात सहभाग घेणारा पत्रकार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सदस्य प्रेमनाथ एकनाथ कदम यांनी आपल्या राहत्या घरी मंगळवार दि 14 रोजी रात्री 8 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. बर्‍याच दिवसांपासून प्रेमनाथ कदम हे आजारी होते.याच्या सातत्याने तणावाखाली ते असायचे. प्रेमनाथ कदम वय 65 यांनी मंगळवार रोजी सायंकाळी आठच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभर ते सर्वांशी हसून खेळून बोलताना बघण्यात आले. मात्र अचानक रात्री ८ वा.सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची वार्ता धडकली. रात्री उशिरा  परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार