MB NEWS-कोरोनाच्या व्यत्ययी दोन वर्षानंतर आषाढी वारीच्या दिंड्या परळीत दाखल ;भाविकांत भावभक्तीचा उत्साह

 कोरोनाच्या व्यत्ययी दोन वर्षानंतर आषाढी वारीच्या दिंड्या परळीत दाखल ;भाविकांत भावभक्तीचा उत्साह

VideoNews पहा:● *दिंड्या परळी वैजनाथ पंचक्रोशीत दाखल.*


 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

        कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत गेलेल्या दोन वर्षापासून खंडित झालेल्या पंढरपूर आषाढी वारी च्या दिंड्या यावर्षी मोठ्या उत्साहात पूर्ववत सुरू झाल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्याच्या भागातून अनेक दिंड्या परळी मार्गे मार्गस्थ होतात. दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी परळीत अनेक दिंड्यांचे आज आगमन झाले. यानिमित्ताने भाविक भक्तांच्या भावभक्तीचा ओढा व उत्साह वाढल्याचे चित्र दिसून येत होते.

          दरवर्षी परळी मार्गे जवळपास 70 दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. विविध देवस्थाने व वारकरी फडांच्या वतीने पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंड्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ क्षेत्रातून जातात. काही दिंड्यांचे दोन मुक्कामही परळी मध्ये असतात. यात प्रामुख्याने शेगाव संस्थांच्या संत गजानन महाराज पायी दिंडी सोहळा तसेच गुलाबराव महाराज यांच्या भव्य दिव्य सोहळा परळीत दोन दिवस मुक्कामी असतात. विशेष म्हणजे या त्यांच्या आगमनाच्या वेळी शुद्ध एकादशी येत असल्याने संत गजानन महाराज यांच्या दिंडीचे दोन मुक्काम परळी शहरांमध्ये असतात. शहरात दाखल होणाऱ्या सर्व दिंड्यांचे भाविक मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. ठिकठिकाणी या दिंड्यांच्या सेवेचे कार्य सामाजिक संघटना, नागरिक वर्षानुवर्षे करत आलेले आहेत. 

          आज दिनांक 23 रोजी या दिंड्या मधील प्रमुख दिंड्या असलेल्या संत गजानन महाराज व संत गुलाबराव महाराज यांच्या दिंड्या परळी शहरात दाखल झाल्या. संत गजानन महाराज यांच्या दिंडी चा आजचा मुक्काम शक्तीकुंज वसाहत येथे असतो. सकाळी ही दिंडी शक्तीकुंज - वसाहत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल-  मार्गावरून वैद्यनाथ मंदिर- संत जगमित्र नागा मंदिर पर्यंत मार्गस्थ होते. उद्या दि.२४ रोजी दिवसभर संत गजानन महाराजांची पालखी परळी शहरातच असते. या वेळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी सहभागी होतात. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पूर्ववत शहरात येणाऱ्या या दिंडीच्या स्वागताला आज भाविक भक्त अतिशय उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार