MB NEWS-मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे

 मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे






परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...

          गोपीनाथ गडावरुन  दरवेळी समाजातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा  सन्मान करण्यात येतो.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडलेला आहे.दरवर्षी गोपीनाथ गडावर एक संकल्प घेतला जातो आणि तो वर्षभर राबवला जातो.ओबीसींच्या आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात सुरू आहे.मध्यप्रदेश सरकारने मात्र ओबीसींना न्याय दिला आहे.यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर  सन्मान करुन एक व्यापक संदेश देण्यात येणार असल्याचे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्य कार्यक्रमापुर्वी एम बी न्यूज शी बोलताना सांगितले.





              एका बाजूला महाराष्ट्रात ओबीसींना न्याय मिळावा यासाठी लढा सुरू आहे.या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश या आपल्या राज्यात ओबीसींना न्याय देणारे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर येणार असुन त्यातून खुप मोठा संदेश जाणार आहे. गोपीनाथ गडाच्या व्यासपीठावर नेहमीच वंचित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर, व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो.त्यांच्या प्रश्नावर चर्चा होते.अशा व्यासपीठावर ओबीसींना न्याय देणार्‍या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा सन्मान करण्यात येणार आहे असे भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

              लोकनेते गोपीनाथराव मुंडे  यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज दुपारी ३‌३०वा.  गोपीनाथ गडावर येत आहेत.  हा स्मृती दिन  "संघर्षदिन सन्मान" म्हणुन साजरा केला जात असुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर व इतर मान्यवरांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार