MB NEWS- *संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान*

 संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान



  • ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         गोपीनाथ मुंडे म्हणजे अविरत संघर्ष, साहस आणि वंचित घटकांची सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी परळीत गोपीनाथगडावर केले.



          दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या परळी जवळील गोपीनाथ गड येथे आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. या समारंभात संघर्ष सन्मान म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा "संघर्षदिन सन्मान" म्हणुन  प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर,ललिता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान सन्मान करण्यात आला. 



      याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, मी आज गोपीनाथ गडावर एक भाजपाचा नेता किंवा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर स्वर्गीय मुंडे यांचा भाऊ म्हणून उपस्थित झालो आहे. भाजपाचे मजबूत संघटन आज देशभरात दिसून येते या संघटना ला महाराष्ट्रात गावागावा पर्यंत पोहचवण्याचे कार्य स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी केले. मध्यप्रदेशमध्ये काम करताना सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनीच आपल्याला अध्यक्ष म्हणून पक्षात संधी दिली आणि मुंडे-महाजन यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अगदी जवळून मी या दोघांचेही काम पाहिलेले आहे. वंचित, उपेक्षित ,पिडीत घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी जीवनभर केले. गोपीनाथ मुंडे स्वतः गरीब परिवारातून आल्याने गरीबीच्या झळा अनुभवतच त्यांनी राजकारणात गरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी अविरत संघर्ष केला. गोरगरिबांना न्यायासाठी ते जेवढे प्रेमळ होते तेवढेच गुंडशाही झुंडशाहीच्या विरुद्ध वज्राप्रमाणे कठोर होते ते त्यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना दाखवून दिले आहे. संघर्ष, साहस व सेवा हा त्रिवेणी संगम या लोकनेत्यामध्ये नक्कीच बघायला मिळतो. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊनच जनकल्याणाचे कार्य अविरत त्यांच्या मुली करत असल्याचे कौतुकास्पद आहे. आपण सारे मिळून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जनसेवेचा हा वारसा निश्चित पुढे चालवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

      


    ओबीसी आरक्षणाच्या विषयावर बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण द्यायचेच असा आपला ठाम निर्धार होता.न्यायालयांमध्ये यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन बाजू मांडली. आयोग, प्रशासन व स्वतः दिवस-रात्र एक करून ओबीसींना आरक्षण मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसलो नाही. मनातून काही द्यायचे असेल तर ती तडफ आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर निश्चित मार्ग निघतो. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचा नक्कीच विचार करावा असा चिमटाही त्यांनी भाषणात बोलताना काढला. पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांना जपा, त्यांच्यामागे पाठबळ उभे करा, निश्चितच पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणेच जनसेवेचा वारसा पुढे चालू राहील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.



       प्रारंभी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे,अँड. यशश्री मुंडे यांनी तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. कार्यक्रमास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुंडेप्रेमी उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !