MB NEWS-काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे

 काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे



परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....

       काय मिळेल याची चिंता नको,सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू असा खंबीर आत्मविश्वास भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर आपल्या हजारो समर्थकांसमोर व्यक्त केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.



       दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिदिन समारंभ झाला. यावेळी पंकजा मुंडे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती.याप्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, ओबीसींची सुरक्षितता राहण्यासाठी ओबीसी आरक्षण हवे आहे. शिवराजसिह यांनी दिले, आपण का देऊ शकत नाही याचा महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे.मध्यप्रदेशचे अनुकरण केले पाहिजे. सगळेच विचारतात ताई, तुम्हाला काय मिळणार.मला काहीही नको.कोणत्याही पदाची लालसा नाही. मला पराभवाने खूप काही शिकविले. मिळेल ती जबाबदारी आणि संधीचे सोने करुन दाखवु.तुमचा आशिर्वाद कायम ठेवा अशी साद त्यांनी यावेळी घातली.



      पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की,   आताच्या राज्य सरकारमध्ये काय चालले आहे. जात, पात, धर्म यावर राजकारण सुरू आहे. गोपीनाथ मुंडेंनी यापलिकडे जाऊन मानवता धर्म शिकवला आहे.आपण त्या मार्गाने वाटचाल करु. आपले कार्यं सत्तेसाठी नाही वंचितासाठी आहे.सत्यासाठी आहे. मुंडे साहेबांच्या विचारासाठी आहे. वंचितासाठी मी कायम उभी राहील, असा निर्धारही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या........

संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार