MB NEWS-आजच फडणवीस - शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता

 आजच फडणवीस - शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले. तब्बल १० दिवसांनंतर एकनाथ शिंदे आज गोव्यावरुन मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुंबई विमानतळावरून रवाना झाले असून सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आजच फडणवीस - शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
        राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचे दुःख आम्हालाही आहे. ठाकरेंच्या विषयी आमच्या मनात कालही आदर होता आजही आहे, अशी भावना शिंदे यांनी गोव्यातील दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्यानंतर ते पराग अळवणी, रविद्र चव्हाण यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदेच्या गाडीचा ताफा राजभवनाकडे रवाना झाला असून ते पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस व त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. मुंबई पोलिसांनी शिंदेंना कडेकोड सुरक्षा दिली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत शिंदे फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे तब्बल १० दिवसांनंतर शिंदे मुंबईत परतले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार