MB NEWS-परळी शहर पोलिसांची कारवाई: १२ लाखांची अवैध दारु व आरोपी ताब्यात

 परळी शहर पोलिसांची  कारवाई: १२ लाखांची अवैध दारु व आरोपी ताब्यात




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    शहर पोलिसांनी  कारवाई करीत गस्ती दरम्यान लाखो रुपयांची प्रतिबंधित अवैध दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पकडली आहे.ही कारवाई बुधवार दि 15 रोजी मध्यरात्री नंतर गस्त घालत असताना करण्यात आली या कारवाईत सुमारे 12 लाखाचा मुद्देमाल व 3 आरोपी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.


     परळी शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे भास्कर केंद़े, गोविंद भताने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परळी- अंबाजोगाई रोडवर बायपास चौक येथे पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरित्या उभी केलेली आढळून आली.सदरील ठिकाणी असलेले पीक अप व कर याची तपासणी केली असता पीक अप मध्ये केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेली प्रतिबंदीत दारू आढळून आली.ज्या मध्ये मॅकडॉल कंपनीच्या 1,07520 रुपयांच्या 1680 सिलबंद बाटल्या,इम्पेरीयल ब्लु कंपनीच्या 61,440 रुपयांच्या 980 बाटल्या,रॉयल स्टाग कंपनीच्या 19,200 रुपयांच्या 240 बाटल्या,5,50,000 रुपयांची एक पांढऱ्या रंगाचे महीद्रा मॅक्स पिकअप क्र. MH-25-P-0209, 4,00,000 रुपयांची स्विफ्ट डिझायर कार क्र MH-46-AD-5603 असा मुद्देमाल व वाहन जप्त करीत  कारवाई केली.मध्यरात्री गुरुवार रोजी पहाटे 2 च्या सुमारास बाय-पास चौक अंबाजोगाई रोडवर केली.या कारवाईत दत्तात्रय भिकाजी वाघमारे (वय 44  रा. रत्नापुर पो. येरमाळा जि. उस्मानाबाद), व्यकटेश नागनाथ गंजेवार (वय 22 रा. मंगळवार पेट अंबाजोगाई), रोहन राजाभाऊ जाधव वय 22 रा. भगवान बाबा चौक अंबाजोगाई ता. अंबाजोगाई) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


 शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.सपकाळ, सपोनि गोस्वामी,गुन्हे शाखेचे भास्कर केंद्रे,गोविंद भताने पोना. लोहबंदे,प्रल्हाद भताने यांनी ही कामगिरी केली . या प्रकरणी ठाण्याचे कर्मचारी प्रल्हाद भताने यांच्या फिर्यादीवरून कलम 420,34 भादवि सहकलम 65 ई म.प्रो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !