युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा



परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)

          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

           योग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे, भारतामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जूनला योग दिन म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने जगभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. करा योग रहा निरोग या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर योग दिवस साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात यावा यासाठी योग शिबीराचे आयोजन करण्यात यावे व त्यासाठी काही प्रोटोकाँल ठरवून देण्यात आलेले आहेत. गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग दिन आपापल्या घरातच योग दिन साजरा करण्यात आला. 



यंदा मात्र सर्वत्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार योग दिन साजरा करण्यात आला. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील योग गुरु प्रा.डॉ. अरुण चव्हाण यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांना योगाचे धडे दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.फुटके यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या