इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-३० हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यास पकडले ;एसीबीच्या बीड पथकाची कारवाई

 ३० हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यास पकडले



एसीबीच्या बीड पथकाची कारवाई


अंबाजोगाई प्रतिनिधी:- केलेल्या विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंबाजोगाईत कार्यालयातच बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केली.संजयकुमार कोकणे असे लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून बीडच्या पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, पदभार स्वीकारताच त्यांनी कार्यालयात गुत्तेदार पिस्तुलचा धाक दाखवून बिलांवर सह्या घेतात, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या प्रकरणानंतर कंत्राटदारांची अडवणूक करणे, अरेरावीची भाषा करणे असे प्रकार समोर आले होते. अशा प्रकारे कोकणे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.

टिप्पण्या

  1. अश्या लाचखोर अधिकारी यांना घरीच बसवायला पाहिजे.व इतरांनी हि असे धाडस करायला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!