MB NEWS-काल कार्यकारी अभियंता तर आज भूमी अभिलेखचा भूकरमापक लाच घेताना पकडला

 काल कार्यकारी अभियंता तर आज भूमी अभिलेखचा भूकरमापक लाच घेताना पकडला



बीड दि. 23 : कालची कार्यकारी अभियंता लाच घेताना पकडल्याची घटना ताजी असतानाच आज बीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि. 23) केली.

VideoNews पहा:● *दिंड्या परळी वैजनाथ पंचक्रोशीत दाखल.*

          तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता, आरोपी भूकरमापक शेख अब्दुल अतिख यांने सदरच्या प्लॉटची मोजणी मार्च 2022 मध्ये करून हद्द कायम करून दिली, केलेल्या कामाकरिता 17 जून 2022 रोजी दोन मजुरांची मजुरी प्रत्येकी 500 रुपये असे 1000 रुपये लाचेची मागणी केली. एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसिबीचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस श्री. अमोल धस, पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी यांनी केली.

क्लिक करा व वाचा: कोरोनाच्या व्यत्ययी दोन वर्षानंतर आषाढी वारीच्या दिंड्या परळीत दाखल ; भाविकांत भावभक्तीचा उत्साह*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार