MB NEWS-इंजिनिरींगच्या विद्यार्थास लुटणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या दोन तासात गजाआड

 इंजिनिरींगच्या विद्यार्थास लुटणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या दोन तासात गजाआड 



  संभाजीनगर  पोलीसांची कार्यवाही

  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           दिनांक 15/06/2022 रोजी पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वै. येथे तक्रारदार नामे गणेश परमेश्वर घनोकार वय 21 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. बेलुरा ता. नांदुर जि. बुलढाणा यांनी तक्रार दिली की, ते दि. 14.06.2022 रोजी 12.00 कोल्हापुर नागपुर या रेल्वेने परळी येथे दि. 15.06.2022 रोजी 00.02 चे सुमारास परळी रेल्वे स्थानक येथे पोहचले व अंधार असल्याने ते 02.00 ते 04.00 वा पर्यंत रेल्वे स्थानक येथेच थांबले व 04.30 वा. ते रहात असलेल्या केशवराज लॉज कडे चालत जात असताना उड्डाणपुलावर असताना पाठीमागुन एक पांढऱ्या रंगाचे स्कुटीवर तीन इसम आले व त्यानी गणेश यास थांबण्यास सांगितले व त्याच्यातील एका इसमाने त्याच्या जवळील कोयता काढला व धमकावून तुझ्या जवळचे पैसे काढ असे म्हणाल्याने त्याने भितीने त्याच्या खिशातील पॉकेट काडुन 700 रुपये दिले. त्यानंतर दुसन्या इसमाने त्याच्या खिश्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व त्यांनतर तिघांनि त्याला जबरदस्तीने स्कुटीवर बसवुन ICICI बँकेच्या ATM मध्ये घेवून गेले त्यांच्या पॉकेट मधील ATM कार्ड जबरदस्तीने काढून मारहाण करुन पिन सांगायला लावुन त्याच्या वडीलांचे अकाऊट मधील 1500 रुपये काढुन घेतले व त्याला परत स्कुटीवर बसवुन बसस्टॅंड जवळ नेहुन मारहाण करुन सोडुन निघुन गेले. सदर बाबत गणेश यांने पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. येथे येवून कळवले व पोलीस तक्रार घेत असतांना गणेशची परीक्षा असल्याने तो पेपर देवुन आल्यावर मी पोलीस स्टेशनला येवून सविस्तर तक्रार देतो म्हणुन गेला व परिक्षा संपल्या नंतर पोलीस स्टेशनला येवून तक्रार दिल्या वरुन


पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. येथे गु.र.न. 120/2022 कलम 365,392,34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून तात्काळ तक्रार सपोनि./एन.व्हि. गित्ते, पोउपनि.सी.एच. मेंढके, सफभताणे, पोना/ सानप, पोना/शिंदे, पोना/पठाण, पोकों/दुर्गे यांच्या दोन टिम तयार करुन एक टिम तक्रारदार यास सोबत घेवून CCTV फुटेज चेक करण्यास व एक टिम रेकॉर्डवरील गुन्हेगार शोधणेसाठी रवाना केल्या. दाखल होताच तक्रारदार यांने दाखवलेल्या ICICI बँकेच्या ATM मधील CCTV फुटेज पाहुन पोना सानप यांनी त्यातील एका अरोपीस ओळखले वरुन तक्रारदारास पो.स्टे. ला सोडुन टिम सदर अरोपीच्या मागावर जावुन त्यास अवघ्या 15 मिनटात ताब्यात घेतले त्यानंतर परत टिमने जावुन इतर दोन अरोपी यांना एक तासात ताब्यात घेतले अरोपीना कसोशीने व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.


तसेच तपासा मध्ये वेग यावा म्हणुन पो. नी. चाटे यांनी सफी / आयटयार, पोह/ होळंबे, पोह/देशमुख, पोना/अचार्य यांचे ही एक पथक बनवुन तपासाला गती दिली त्यामुळे गणेश धनोरकर या गुरुगोविंदसिंग कॉलेज नांदेड येथे इलेक्ट्रीकल इंजेनरीगच्या तिसन्या वर्षात शिकणाऱ्या व परिक्षेसाठी एंन्ट्रनशिपची परिक्षा देण्यास थर्मल पावर स्टेशन येथे अलेल्या विद्यार्थास लुटणान्या गुन्हेगाराना अवघ्या दोनतासात पोलीसांनी पकडुन गजाआड केले.


सदरची कार्यवाही मा.श्री.नंदकुमार ठाकुर साहेब, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती कविता नेरकर मॅडम अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई,मा.श्री.सुनिल जायभाये उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !