MB NEWS-शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या पुढाकाराने वृक्षरोपण

 सत्यवान-सावित्री कथास्थळी नव्याने वटवृक्षाचे रोपण ; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त असंख्य महिलांनी घेतलं दर्शन 



 शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या पुढाकाराने वृक्षरोपण 

परळी :   जेष्ठ शुध्द पोर्णिमा म्हणजे वटपोर्णिमा, आपल्या पतीस दिर्घ आयुष्य लाभून हाच पती पुढचे सात जन्म मिळावा यासाठी देशभरातील महिला हा सण मोठ्या उत्साहात  साजरा करतात. यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण वाचवणार्या सत्यवान-साविञीची घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या पूर्वी सात मोठे वटवृक्ष होते परंतु सध्या त्या ठिकाण वटवृक्ष नसल्याने हा परिसर ओस पडला होता, त्या ठिकाणी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.रोहिणीताई स्वामी व अनिताताई स्वामी यांच्या हस्ते वटपोर्णिमानिमित्त वटवृक्ष रोपाचे वृक्षरोपण करण्यात आले. 










यावेळी श्री. आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, सत्यवानाचे प्राण साविञीने परत मिळवले ते परम पावन क्षेञ म्हणजेच प्रभाकर क्षेञ तेच आजचे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र होय. ही कथा जेथे घडली ते ठिकाण म्हणजे आज मलिकपूरा भागाच्या पाठिमागे वटसाविञी नगर जवळ असलेल्या तलावाच्या मधोमध हे वटेश्वर लिंग आणि सावित्री चे मंदिर एका दगडी वट्यावर उघड्यावर आहे. एवढे धार्मिक महत्त्व आणि अधिष्ठान असलेले हे मंदिर जीर्णोध्दाराच्या प्रतीक्षेत आहे. हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.

यावेळी वृक्षरोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बळवंत चव्हाण सर,  प्राचार्य अतुल दुबे सर , क्रीडा शिक्षक अजय जोशी सर, अविनाश गवळी, मुसा भाई  उपस्थित होते, तर या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन भांडे,संतोष पौळ,दिपक क्षिरसागर आदी वृक्षप्रेमी यांनी वृक्षरोपण करण्यासाठी परिश्रम घेतले. पूजाविधी करण्यासाठी या परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !