युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- 'शिवसेनेत मला किंमत नाही'; एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला होता फोन!

 'शिवसेनेत मला किंमत नाही'; एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला होता फोन!



मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, शिवसेनेत आपल्याला किंमत दिली जात नाही, आपण डिस्टर्ब आहोत, असे सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना फोनवर सुनावले होते. त्यानंतर त्यांनी त्यांनी आपला फोन बंद करून ते सुरतकडे निघाले. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना लोअर परेल येथील सेंट रेगीस या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ठेवले आहे.



शिंदे हे आघाडी सरकारच्या स्थापनेपासून नाराज होते. त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन शिवसेनेच्या नेतृत्वाने दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री बनले. काल सायंकाळी शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. तेव्हा आपण शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल नाराज आहोत. आपल्याला महत्वाचे निर्णय घेताना डावलले जात आहे, असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन बंद ठेवला आहे.


शिंदे यांच्या बंडाची कल्पना काल संध्याकाळी आली. त्यांनी शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि आमदार फाटक यांना वर्षावर बोलावून घेतले. तेथून शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान, शिवसेनेच्या इतर आमदारांना सेंट रेगीस हॉटेलमध्ये हलविले.





महाराष्ट्रात राजकीय भूकंप; मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १५ आमदार नॉटरिचेबल

दोन दिवसांपासून शिंदे यांनी रणनिती आखली होती. त्यांनी ठाण्यातील नगरसेवकांना कल्पना दिली होती. शिंदे यांच्या सोबत सुरतला बालाजी किणीकर, अंबरनाथ, विश्वनाथ भोईर कल्याण, महेंद्र थोरवे कर्जत, भरत गोगावले महाड, शहाजी पाटील, सांगोला यांच्यासह संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे आदी आमदार असल्याचे कळते.


सेनेचे ‘हे’ आमदार आहेत नॉटरिचेबल

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी जवळपास पंधरा आमदार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सध्या संजय रायमुलकर, संजय गायकवाड, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, महेंद्र दळवी, शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, प्रदीप जयस्वाल या शिवसेना आमदारांचे फोन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये किती आमदार उपस्थित राहतात हे स्पष्ट होईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या