MB NEWS-⬛ आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

-------------------------- 



मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. 


राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.


राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निकालानंतर नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणुकही अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत.

*आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांनाही संधी नाकारत सचिन अहिर व नंदुरबारचे जुने शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली आहे. भाजपाने पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी नाकारली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे यांचे पुनर्वसन केले. 


प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय तसेच भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे यांनाही भाजपाने उमेदवारी दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देताना प्रसाद लाड यांना पाचवे उमेदवार ठेवले आहे. राष्ट्रवादीकडून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या दोन मुंबईकर नेत्यांना मैदानात उतरविले आहे. 

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.







या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !