MB NEWS-केज येथे मोटार सायकल व एसटी बसच्या अपघातात एक ठार एक जखमी

 केज येथे मोटार सायकल व एसटी बसच्या अपघातात एक ठार एक जखमी



अपघातातील मयत व जखमी पाहून परत येत असलेल्या मित्राचाही अंबाजोगाई अपघात

केज :- केज येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनीजवळा पाटी जवळ च्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ एसटी बस आणि मोटार सायकलीच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांना पाहून गावाकडे परत येत असलेल्या युवकाच्या दुचाकीचा अंबाजोगाई येथे अपघात झाला आणि त्यात तोही जखमी झाला आहे.


या बाबतची माहिती अशी की, दि. १४ जून मंगळवार रोजी रात्री ७:३० वा. च्या दरम्यान केज येथे केज-अंबाजोगाई रोडवर सोनिजवळा पाटी जवळील जलशुद्धीकरण केंद्रा जवळ लातूर-बीड या लातूर कडून बीडकडे जाणाऱ्या एसटी बस क्र. (एम एच-२०/बी एल-१९२४) आणि मोटार सायकलचा क्र. (एम एच-२५/ एस-१९२४) अपघात झाला. अपघातात सतीश गोवर्धन मस्के वय (२५ वर्ष) रा. सावळेश्वर पैठण ता. केज जि. बीड युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच्या मागे मोटार सायकलवर बसलेला दुसरा युवक दिपक श्रीहरी डिसले वय (२४ वर्ष )रा. सावळेश्वर (पैठण) ता. केज जि. बीड गंभीर जखमी झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह महादेव बहिरवाळ, हनुमंत गायकवाड आणि संतोष गित्ते यांच्या पथकाने घटनास्थळी अपघातातील जखमी आणि मयत यांना उपजिल्हा रुग्णालय केज व नंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.


मित्राचा अपघात होताच त्यांना पहायला गेलेल्या मित्राचाही अपघात ! 

-----------------------------------------------------

दरम्यान अपघाताची माहीती मिळताच अपघातग्रस्त तरुणांचा सावळेश्वर येथील मित्र ऋषीकेश गणेश मस्के हा त्यांना भेटून गावाकडे परत येत असताना दि. १५ जून बुधवार रोजी मध्य रात्री १:०० च्या दरम्यान त्याच्या दुचाकीचा अंबाजोगाई येथील शिवाजी चौका जवळ अपघात झाला. त्या अपघातात ऋषीकेश गणेश मस्के वय (२४ वर्ष) रा. सावळेश्वर (पैठण) ता. केज जि. बीड गंभीर जखमी झाला आहे. दिपक श्रीहरी डिसले व ऋषीकेश गणेश मस्के या दोघांवर लातूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषिकेश मस्के यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार