MB NEWS- न्यू हायस्कूल कॉलेज येथे जागतिक योग दिन साजरा

 न्यू हायस्कूल कॉलेज येथे जागतिक योग दिन साजरा




परळी वैजनाथ , (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.



                शहरातील थर्मल कॉलनी वसाहत येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय येथे दि.२१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कॉलेजचा माजी विद्यार्थी श्रेयस चव्हाण विविध आसने करून दाखवून कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून सदरील आसने करून घेतले. योगाच्या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजू कोकलगाव यांनी केले. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासद अजय सोळंके सर अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एन.एच. शेंडगे, उपप्राचार्य सुनील लोमटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे , प्रा. डॉ. श्रीहरी गुट्टे यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार