MB NEWS-नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?

 नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?








राजकीय उलथापालथीनंतर निर्माण झालेल्या परस्थितीचा फायदा कोणाला आणि नुकसान कुणाचे हे सध्या तरी स्पष्ट होत नाही. या सर्व घडामोडींमध्ये मध्यंतरी काहीशा राजकारणात दुर दिसत असलेल्या   पंकजा मुंडे  यांनी कार्यकरणीच्या बैठकीला तर उपस्थिती दर्शवली होतीच पण आजच्या सत्तानाट्य दरम्यान जेव्हा एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले तेव्हा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यादेखील तिथे आगोदरच उपस्थित होत्या. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का असे प्रश्न पुन्हा नव्याने समोर येत आहेत.

    विभानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांची भाजपाच्या मास लिडर म्हणून ओळख आहे. त्यामुळे विधानसभा नाहीतर विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांना आमदारकी मिळेल असा आशावाद कायम कार्यकर्त्यांना राहिलेला आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात दोन वेळेस विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या पण पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधीच मिळालेली नाही. त्यामुळे कार्यतर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल पुन्हा आशा....

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट सत्तेत आला आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापासून सक्रीय राजकारणातून पंकजान मुंडे या काहीशा दुरावलेल्या आहेत. यातच आता भाजपाची सत्ता आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा यामुळे पंकजा मुंडे यांना संधी मिळते का हे पहावे लागणार आहे. संधी निर्माण झाली की पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतेच.

      


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !