MB NEWS-परळी वैजनाथ: विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

 विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।




परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       टाळ-मृदंगाचा झंकार…अंभगाचा नाद अन् ढगाळी ऊन-सावलीची साथसंगत…अशा अत्यंत भारलेल्या वातावरणात संत गजानन महाराज पालखी सोहळ्याने परळी अंबाजोगाई मार्गा दरम्यान कनेरवाडी च्या पुढे असलेल्या घाटाचा टप्पा आज शनिवारी सकाळी पार केला. अन् या भक्तिप्रवाहास सोबत घेत पालखी अंबानगरीकडे मार्गस्थ झाली.


      संत गजानन महाराज पालखीचा दोन दिवस परळीत मुक्काम होता. परळीकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा आज अंबाजोगाईच्या दिशेने मार्गस्थ झाला. जड अंतःकरणानेच परळीकरांनी पालखीला निरोप दिला. परळी, कनेरवाडी येथे पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.पालखी सोहळा टाळ-मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात कनेेवाडी ओलांडून घाटाच्या दिशेने निघाला.घाट पाहताच वारकऱ्यांच्या अंगात बळ संचारले. हा घाट जणू पालखीच्या स्वागतासाठीच उभा ठाकलेला. घाटावरचे प्रसन्न वातावरण पाहून वारकऱ्यांची मने अधिकच प्रफुल्लित झाली.वैष्णवांच्या मेळ्याने घाटात प्रवेश केला. विठुनामाचा गजर सर्वत्र टिपेला पोहोचला. पालखीसोबत वारकरीही धावू लागले. टाळ-मृदंगाचा, अभंगाचा निनाद डोंगरकपाऱ्यात घुमला. अवघा घाट विठुनामाच्या गजरात दुमदुमून गेला. भाविकांनी हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी घाटात मोठी गर्दी केली होती.
@@@
   डोळ्याचे पारणे फेडणारे मनमोहक दृश्य.... 
      बालाघाटच्या रांगा हिरव्यागार रांगा आणि त्यावर भगवी पताका हवेत फडफडतांना,डोलतांना पाहतांना अतिशय मन प्रफुल्लित होत होते. आज शनिवारी ( दि.२५) सकाळी परळीतून कन्हेरवाडी ,अंबलवाडी घाटातून पुढे प्रस्थान झालेली ही पालखी रात्री झालेला पाऊस आणि सकाळी असलेल्या आल्हाददायक ,गारवा,वातावरण मन प्रसन्न करणारे टाळांचे किन किन आवाज,गण गण गणात बोते, माऊली, माऊली 
राम कृष्ण हरीचा ,जय घोष आणि त्यावर चालणारे पाऊले.... सर्वात समोर तीन अश्व त्या पाठोपाठ भगव्या पताका घेतलेले सेवेकरी, त्यामागे टाळकरी त्यामागे श्रीची पालखी व पादुका, पुढेमागे मृदंग, विणेकरी, डोक्यावर तुळशीचा कुंडा, भगवी पताका ,अतिशय नयनरम्य दृष्य घाटातील वळणावर बघायला मिळाले.

मनमोहक दृश्ये:-






    





   परळीजवळील कनेरवाडी-अंबलवाडी घाटातून संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे टिपलेली मनमोहक छायाचित्रे.(सर्व छायाचित्रे -सुनील फुलारी,परळी वैजनाथ.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !