MB NEWS- *कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लोणवळ तलाव दरम्यान बंद नलिकेद्वारे कालवा जोडणीच्या कामास 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान*

कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लोणवळ तलाव दरम्यान बंद नलिकेद्वारे कालवा जोडणीच्या कामास 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान


माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकांमध्ये वेळोवेळी उपस्थित केला होता मुद्दा


जिल्ह्यातील प्रस्तावित इतरही प्रकल्प मार्गी लागतील धनंजय मुंडेंना विश्वास


परळी (दि. 21) - बीड जिल्ह्यातील उपळी ता. धारूर येथील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या कुंडलिका मध्यम प्रकल्पातून उजव्या कालव्या द्वारे लोणवळ तलावात सोडण्यात येणारे पाणी बचत व लाभ क्षेत्राची वाढ व्हावी, या माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आता बंद नलिकेद्वारे वितरित करण्यात येणार असून, या दुरुस्ती कामासाठी 1 कोटी 13 लाख 66 हजार रुपये खर्चाच्या आरखड्यास जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. 


लोणवळ तलावात बंद नलिकेद्वारे पाणी सोडल्याने पूर्वी पाणी वाहत जाऊन लागणारा वेळ कमी होणार असून त्याचबरोबर तेलगाव, कुप्पा, नित्रुड आदी भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वेळोवेळी यासह बीड जिल्ह्यातील अन्य काही लघु व मध्यम प्रकल्पातील दुरुस्ती व अन्य कामांसाठी पाठपुरावा केला होता. 


मागील अडीच वर्षांच्या काळात जलसंपदा विभागाने बीड जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या काही लघु व मध्यम प्रकल्पांना पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे, त्या प्रकल्पांचे काम आगामी काही दिवसात हाती घेणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही मध्यम व लघु प्रकल्पांचा गाळ काढून उंची वाढवणे, माजलगाव उजवा कालवा अस्तरीकरण, यासह काही तलावांच्या व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित किंवा मान्यतेसाठी अंदाजपत्रकासह सादर करण्यात आलेली आहेत, जिल्ह्यातील ही सर्व कामे आगामी काळात मार्गी लागतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार