MB NEWS-पाश्चात्यांच्या अनुकरणापेक्षाभारतीय संस्कृती परंपरा जपणे आवश्यक- ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी

 पाश्चात्यांच्या अनुकरणापेक्षा भारतीय संस्कृती परंपरा जपणे आवश्यक-  ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी



परळी,भौतिक अलंकारांचे लक्ष कमी करून सात्विक अलंकारांचे धारण केले पाहिजे,  हे सध्याच्या युगात अतिशय आवश्यक आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती परंपरा जपणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्रमन्मथधाम संस्थान ,कपिलाधार मांजरसुंबा-बीड येथील  ष.ब्र 108 श्री सद्गुरु डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी केले                                          वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने   येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक) यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त  दिनांक 19जुलै 22  सायंकाळी पाच वाजता ष ब्र 108 सद्गुरु श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधामकर  यांचे प्रवचन  झाले .                                       

       यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य गुरुवर्यांनी बाह्य आवरण भस्म ,रुद्राक्ष माळा,  हे सर्व सात्विक अलंकार आहेत. इतर भौतिक अलंकार हे आपल्याला अहंकार देतात तर सात्विक अलंकार हे आपल्याला आत्मिक आनंद विनम्रता तसेच अलौकिक असे समाधान देतात. म्हणून भौतिक अलंकारांचे लक्ष कमी करून या सात्विक अलंकारांचे धारण केले पाहिजे हे सध्याच्या युगात अतिशय आवश्यक आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती परंपरा जपणे अतिशय आवश्यक आहे. कुटुंबातील परिवारातील देशातील परस्पर सद्भाव वाढविणे आवश्यक आहे. वीरशैव  सिद्धांतामध्ये जीवात्मा शिव तत्वामध्ये विलिन करण्यासाठी तामसिक अलंकार पेक्षा सात्विक अलंकार जास्त महत्त्वाचे आहे. वीरशैवाचार षोडशसंस्कारातिल अत्यंत उपयुक्त व वैशिष्ट्य पूर्ण गर्भेष्टलिंगधारणेच्या संस्कार कुठलाही स्त्रीपुरुष मधील भेदभाव न मानता सर्वांना समान रूपाने लिंगधारण करण्या ची परंपरा विरशैवाचे एक अद्भुत वैशिष्ट्य आहे.असे  सद्गुरु डॉ.  विरुपाक्ष शिवाचार्य महाराजानी  आपल्या प्रवचनात सांगितले    यावेळी सर्व समाज बांधव व भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !