युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-श्री प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत 23 ते 25 जुलै दरम्यान रंभापुरी जगद्गुरू यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे शिवाचार्यांचे आवाहन

श्री प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत 23 ते 25 जुलै दरम्यान रंभापुरी जगद्गुरू यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे शिवाचार्यांचे आवाहन






*परळी वैजनाथ/प्रतिनिधी*


श्री प्रभू  वैद्यनाथाच्या नगरीत धार्मिक कार्यक्रम मोठया प्रमाणात होतात ही आनंददायी बाब आहे,रंभापुरी महापिठाचे  जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची   दि 23 रोजी अड्डपालखी निघणार आहे  व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले, हा कार्यक्रम भव्य दिव्य होईल , 23 ते 25 जुलै दरम्यान जगद्गुरू च्या उपस्थित धार्मिक कार्यक्रम होत आहेत,प्रत्येकानी सहभागी व्हावे अस आवाहन श्री शभुलिंग शिवाचार्य महाराज आंबाजोगाईकर ,,श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम,    श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांनी यावेळी  बोलताना सांगितले.                                           वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने     येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरू शांतेश्वर  स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक)     यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान निमित्त दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी    श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम,  श्री शभुलिंग शिवाचार्य महाराज आंबाजोगाईकर,श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ कर यांच्या उपस्थितीत आरती झाली,व नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ कर यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन  करून सत्कार करण्यात आला. प्रभू श्री वैद्यनाथाच्या सानिध्यात माझा वाढदिवस साजरा केला गेला हे माझे भाग्य आहे, असे  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ कर महाराज म्हणाले,यावेळी  श्री गुरू शांतेश्वर  स्वामीजी,श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम,  श्री शभुलिंग शिवाचार्य महाराज आंबाजोगाईकर ,यांची उपस्थिती होती,कार्यक्रमातस भक्तगण मोठया संख्यने उपस्थित होते,यावेळी ,श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज   मन्मथ धाम,श्री शभुलिंग शिवाचार्य महाराज आंबाजोगाईकर यांचे प्रवचन झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या