गुरू शांतेश्वर स्वामीजी यांचे आषाढमास तपोअनुष्ठान कार्यक्रम सुरू
रंभापुरी महापिठाचे वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची परळीत दि 23 रोजी अड्डपालखी व धर्मसभेचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी मध्ये श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर स्वामीजी(, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी,कर्नाटक) यांच्या आषाढमास तपोअनुष्ठान कार्यक्रम सुरू असून यामध्ये दैनंदिन कार्यक्रम यशस्वी पणे पार पडत आहे.दिनांक 25 जून पासून तपोअनुष्ठान कार्यक्रम सुरू असून ते दिनांक 25 जुलै 2022 आषाढमास तपोअनुष्ठान ची सांगता होणार आहे.
या निमित्त श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची दि 23 रोजी अड्डपालखी निघणार आहे व धर्मसभा होणार आहे.यावेळी अनेक शिवाचार्यांची उपस्थिती लाभणार आहे. श्रीक्षेत्र मन्मथधाम संस्था, कपिलधार, मांजसुंबा येथील ष.ब्र.108 श्री सदगुरू डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 108 श्री गुरूशांतेश्वर स्वामीजी यांच्या आषाढ मासतपोअनुष्ठान मध्ये रोज सकाळी सात ते नऊ रुद्राभिषेक होत आहे.सकाळी नऊ ते अकरा ग्रंथवाचन असून. सकाळी अकरा ते एक द्वितीय पूजा.दुपारी तीन ते 5 शिवपाठ, शिव भजन व पावलांचा कार्यक्रम होत आहे. सायंकाळी पाच ते सहा प्रवचन.6.सायंकाळी सद्गुरूंचे दर्शन व प्रसाद होत आहे या कार्यक्रमास भाविकांची मोठ्या संख्यने उपस्थिती लाभत आहे.
येथील संतश्री गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) व वके्रश्वर मंदिर परळी येथे श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा दि 23 जुलै शनिवारी अड्डपालखी सोहळा, धर्मसभा 24 व 25 जुलै रोजी महापूजा, अनुष्ठान, मंगल पूजन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे परळी येथे आयोजन करण्यात आले आहे , या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ सुरेश चौधरी, नारायणदेव गोपनपाळे, अॅड.शशिकांत नरवणे, अॅड. नरहरीआप्पा टेकाळे,शशांक निर्मळे , शशी चौधरी, शर्व चौधरी, किशोरआप्पा घेवारे, विद्यासागर स्वामी, झाडे अप्पा वैभव नरवणे, गोदावरी चौधरी,सौ निर्मळे सौ. चैतना अजित गौरशेटे, सौ श्रीदेवी शशिकांत नरवणे, सौ पुनम शशांक निर्मळे, सौ.पार्वती सुरेशअप्पा चौधरी ,श्रीमती नलिनी महाजनकु.वैष्णवी शशिकांत नरवणे, श्री.वैद्यनाथ भजनी मंडळ, श्री.गुरु लिंग स्वामी भजनी मंडळ, श्री शंभू महादेव भजनी मंडळ,श्री.शंभू महादेव सेवाभावी भजनी मंडळ, श्री. शिवकन्या भजनी मंडळ, श्री मनमथ स्वामी भजनी मंडळ, श्री.गजानन भजनी मंडळ, श्री. शनैश्वर भजनी मंडळ व समस्त समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा