परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS: सत्तासंघर्षानंतर काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात.

 “कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडले,” असं शिवसेनेनं म्हटलं




   


भाजपाने राज्यामध्ये धक्कातंत्राचा वापर करत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देत देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेनं २०१९ साली ठरलेल्या कथित अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याची आठवण फडणवीसांना करुन दिली आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच अगदी अटलीबिहारी वाजपेयींपासूनचे संदर्भ देत सत्ता मिळ्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्न भाजपाला विचारला आहे.


ठाकरे सरकार वाचवू शकले असते, पण…
“महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून लोकशाहीच्या विजयासाठी आकड्यांचा खेळ करता आला असता. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते, पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही व आपल्या शालीन स्वभावाला साजेशी भूमिका घेतली. ‘वर्षा’ बंगला तर त्यांनी आधीच सोडला होता. बंगला आपल्याकडेच राहावा म्हणून त्यांनी मिर्ची हवन वगैरे करण्याच्या भानगडी केल्या नाहीत. त्यांनी सामान आवरले व ‘मातोश्री’वर पोहोचले. आता मुख्यमंत्रीपद व विधान परिषदेची आमदारकीही त्यागली. शिवसेनेचे पूर्णवेळ कार्य करण्यासाठी ते मोकळे झाले व त्यांनी तसे जाहीर केले,” असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लागवला आहे.

क्लिक करा:*एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री*

…त्यामुळे विधिमंडळाच्या भिंतीवर डोके फोडून घेण्यात अर्थ नव्हता
“उद्धव ठाकरे यांनी जाता जाता सांगितले की, ‘‘मी सगळ्यांचा आभारी आहे, पण माझ्याच जवळच्या लोकांनी मला दगा दिला.’’ ते खरेच आहे. ज्यांनी दगा दिला ते चोविसेक लोक कालपर्यंत उद्धव ठाकरेंचा ‘उदो उदो’ करीत होते. यापुढे काही काळ दुसऱ्यांच्या भजनात दंग होतील. पक्षातून बाहेर पडून दगाबाजी करणाऱ्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई सुरू करताच सर्वोच्च न्यायालयाने ती रोखली व पक्षांतरबंदी कारवाईशिवाय बहुमत चाचणी घ्या, असे सांगितले. राज्यपाल व न्यायालयाने सत्य खुंटीस टांगून ठेवले व निर्णय दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या भिंतीवर डोके फोडून घेण्यात अर्थ नव्हता,” असं शिवसेनेनं म्हटलंय.



अटलबिहारी वाजपेयी यांचा संदर्भ
“पक्षांतर करणाऱ्या, पक्षादेश मोडणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगणे घटनाबाह्य आहे, पण घटनेचे रखवालदारच अशी बेकायदा कृत्ये करू लागतात व ‘रामशास्त्री’ म्हणवून घेणारे न्यायाची तागडी झुकवू लागतात तेव्हा कोणाकडे अपेक्षेने पाहायचे? या सर्व पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन महत्त्वाची विधाने केलेली आठवतात. अटलजींचे सरकार फक्त एका मताने कोसळत असतानाही अटलबिहारी विचलित झाले नाहीत. ‘‘तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमट्यानेही शिवणार नाही,’’ असे ते म्हणालेच, पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजपा नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले, ‘‘मंडी सजी हुई थी, माल भी बिकने के लिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नहीं किया था!’’ अटलजींचा हा वारसा आता संपला आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

क्लिक करा:*एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने,"म्हणाले....*

पाशवी बहुमताचा प्रचंड गैरवापर
“महाराष्ट्रातले आमदार आधी सुरतला नेले. तेथून त्यांना आसामला हलवले. आता ते गोव्यात आले व त्यांचे स्वागत भाजपावाले मुंबईत करीत आहेत. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी असलेले हजारो जवान खास विमानाने मुंबईच्या विमानतळावर उतरले. इतका बंदोबस्त केंद्र सरकार ठेवत आहे तो कोणासाठी? ज्या पक्षाने जन्म दिला त्या पक्षाशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी द्रोह करणाऱ्या आमदारांच्या संरक्षणासाठी? भारतासारख्या महान देशाला आणि त्या महान देशाच्या घटनेला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण बाजारात सगळेच रखवालदार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपली सदसद्विवेकबुद्धी पार गारठून गेली आहे. हे दुखणे नसून धोका आहे. बहुतेक माणसांना ज्याप्रमाणे आकाशात विहार करणे जमत नाही, तसेच विचार करणे जमत नाही. लोकांना शॉर्टकटने सर्वकाही मिळवायचे आहे. अमर्याद सत्तेचा आणि पाशवी बहुमताचा प्रचंड गैरवापर सुरू आहे,” असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

देशात लोकशाही कशी जिवंत राहणार?
“विरोधकांना मिळेल त्या मार्गाने त्रास नव्हे, तर छळ करण्याचे तंत्र उदयास आले आहे. योगी श्री अरविंद एकदा म्हणाले होते, ‘‘राजसत्तेच्या हाती अधिकाधिक अधिकार सोपविण्याची प्रवृत्ती सध्या इतकी बळावली आहे की, त्यामुळे व्यक्तीच्या स्वतंत्र आणि स्वयंस्फूर्त प्रयत्नांना वावच मिळत नाही आणि जरी तो मिळाला तरी तो इतका अपुरा असतो की, शेवटी सत्तायंत्रणेपुढे व्यक्ती असहाय्य होऊन जाते!’’ आज विरोधी बोलणाऱ्या व्यक्तींना याच पाशवी तंत्राचा वापर करून दाबले जात आहे. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

सत्ता हेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर
“शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केले, पण पक्ष बदलण्याची व फुटीरतेला उत्तेजन देण्याची प्रक्रिया राजभवनात चालणार आहे का? महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना घटनेचे रखवालदार राजभवनावरून ताकद कशी देऊ शकतात? लोकनियुक्त विधानसभेचे हक्क आमची न्यायालये व राज्यपाल कसे काय उद्ध्वस्त करू शकतात? या प्रश्नांची उत्तरे इतकी धूसर कधीच झाली नव्हती. पण आता उत्तरे कोणालाच नकोत. सत्ता हेच सगळ्या प्रश्नांचे उत्तर बनले आहे,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय.

मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?
“महाराष्ट्रात गुरुवारी जे घडले त्यावरून सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळे झूठ यावरच शिक्कामोर्तब झाले. सत्तेसाठी आम्ही शिवसेनेशी दगाबाजी केली नाही, असे सांगणाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाचा मुकुट स्वतःवर चढवून घेतला. तोदेखील कोणाच्या पाठिंब्यावर, तर या सर्व बंडाशी आमचा काही संबंध नाही असा भाव जे साळसूदपणे आणत होते, त्यांच्या पाठिंब्यावर. म्हणजे शिवसेनेविषयीची नाराजी वगैरे हा सगळा बनाव होता. आम्हाला आश्चर्य वाटते ते देवेंद्र फडणवीस यांचे. त्यांना पुन्हा यायचे होते मुख्यमंत्री म्हणून, पण झाले उपमुख्यमंत्री. दुसरे असे की, हाच म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे हा फॉर्म्युला निवडणुकीपूर्वी दोघांनी ठरवला होता. मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व
“ठीक आहे, अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर उद्या जनतेला द्यावेच लागणार आहे. कौरवांनी द्रौपदीस भरसभेत उभे करून बेइज्जत केले व धर्मराजासह सगळेच निर्जीव बनून हा तमाशा पाहत राहिले. तसेच काहीसे महाराष्ट्रात घडले, पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रूचे, प्रतिष्ठेचे रक्षण केले. जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल व महाराष्ट्राची अब्रू लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील नक्कीच!

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा:🔴 🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का*

क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!


क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

क्लिक करा:🔴 🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?*


क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब


• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

• क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल


*...तर दांडे हातात घेऊ- आबासाहेब पाटील*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!