MB NEWS-शनिवार, रविवार विशेष अधिवेशन

 शनिवार, रविवार विशेष अधिवेशन








मुंबई -  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली 


 राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला . त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली . माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिंदे यांनी शपथ घेतली . बंड पुकारल्यानंतर शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले .


मुंबईत आल्यावर त्यांनी सागर निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली . त्यानंतर शिंदेआणि फडणवीस राजभवनात दाखल झाले . त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली . दरम्यान राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आजच शिंदे यांनी शपथ घेतली आहे . तर उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी शपथ घेतली आहे . 


या नव्या सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी शिंदे सरकारला शनिवारी बहमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे आता बहुमत चाचणी कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार