MB NEWS-कुशाताई पोटभरे यांना आदर्श ग्राम सेवक पुरस्कार

 कुशाताई पोटभरे यांना आदर्श ग्राम सेवक पुरस्कार



महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनीमुळे शाळेचे नावलौकिक


परळी / प्रतिनिधी


परळी तालुक्यातील मोहा येथील मूळ रहिवाशी असलेल्या कुशाताई पोटभरे-बोराडे यांना सण 19-20 चा आदर्श ग्राम सेवक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कुशाताई पोटभरे ह्या मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.


परळी तालुक्यातील मौजे नागापूर, गर्दैवाडी आदी भागात ग्राम सेवक म्हणून काम करत असतांना गावाची लोकसंख्या, रस्ते, पाणी आणि वीज आदी

मूलभूत सुविध लोकांना पुरवित असताना तारेवरची कसरत सर्वाना समान न्याय देत शासकीय योजना सर्वसामान्य गरजवंताला देण्याचे काम पोटभरे यांनी केले.कोविड 19 च्या काळात मोजे नागापूर येथे कार्यरत असताना गावचे सरपंच मोहन सोळंके यांच्या मदतीने गावाला कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी कार्य दिवस-रात्र एक करून करण्यात त्या यशस्वी झाला होत्या.एकूणच त्यांच्या सेवा कालावधीत केलेलं काम पाहता सण 19-20 मध्ये त्यांना आदर्श ग्राम सेवक म्हणून निवड करण्यात आली.


नुकताच बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्य गृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे,चंद्रशेखर केकान, प्रदीप काकडे,डॉ.ज्ञानोबा मोकाटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी त्यांचे पती मुरलीधर बोराडे,त्यांच्या मातोश्री,बंधू, भगिनी आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !