युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-ओबीसी आरक्षण: निर्णयाचे प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले स्वागत!

 ओबीसी आरक्षण:  निर्णयाचे प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले स्वागत!




परळी वैजनाथ प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला हा निकाल ओबीसीच्या भावना जपणारा निकाल आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचे महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी स्वागत केले आहे तसेच शिंदे फडणवीस सरकारचे व सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानले आहेत. 



    बाटिया आयोगाने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% राजकीय आरक्षण बहाल केले आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. वेळोवेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आपण आवाज उठवलेला आहे प्रसंगी आंदोलने केली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील  निवडणुकीमध्ये ओबीसींना त्यांच्या हक्काच्या राजकीय आरक्षणापासून वंचित राहावे लागले होते परंतु आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


   सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत 27% राजकीय आरक्षणासह निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा असा आदेश दिला आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाल्याने संपूर्ण ओबीसी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे 


   2019 पासून महाविकास आघाडी सरकारने एम्पिरिकल डेटा सादर केला नाही तसेच त्यावर ट्रिपल टेस्ट सुद्धा घेतली नाही त्यामुळे याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेतील घेण्यात आलेल्या निवडणुकीत ओबीसींना बसला अनेक ओबीसी प्रतिनिधींना आरक्षणा विना निवडणूक लढवावी लागली.


   शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक घेऊन  सर्वोच्च न्यायालयामध्ये इम्पेरिकल डेटा सादर केला तसेच ट्रिपल टेस्ट पूर्ण केली त्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या