इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

 पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

  
पंढरपुरच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात यावी, वारीमार्गावरील खड्डे भरून काढावेत, आणि अपघात टाळावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितलं. ते आज ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. त्यामुळे यावर्षी पंढरपुरात गर्दी वाढेल. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता ठेवावी, यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी तसंच काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवावी आणि ते वेळोवेळी रिकामे होतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन......

ते म्हणाले की, शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणं, सामुग्री उपलब्ध करून द्यावीत. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी. रस्त्यांच्या स्वच्छतेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की,  गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घेण्यात यावा, दैनंदिन साफसफाईसाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घेण्यात यावा. मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसंच पंपाचा वापर करून तुंबलेले पाणी काढण्यात यावे, आरोग्य सुविधा, औषधं, फवारणी चौख ठेवावी, ताप आणि साथीच्या आजारांवरील औषधांचा साठा पुरेसा असल्याची खातरजमाकरुन घेण्यात यावी, असंही ते म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!