MB NEWS- राज्य सरकारने व्यक्त व्हावे, मार्ग काढावा मात्र ओबीसी आरक्षण वाचवावे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पंकजाताई मुंडे यांचं ट्विट

 राज्य सरकारने व्यक्त व्हावे, मार्ग काढावा मात्र ओबीसी आरक्षण वाचवावे



सुप्रीम कोर्टाच्या निकालावर  पंकजाताई मुंडे यांचं ट्विट


मुंबई ।दिनांक २८।

ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्य सरकारने व्यक्त व्हावे, मार्ग काढावा मात्र आरक्षण वाचवावे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.


     आज सुप्रीम कोर्टाने 367 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. यावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "काय महत्त्वाचे आहे ? एका वंचित समाजाचा न्याय का निवडणूक जी आधीच उशीराने होत आहे. पण आता झालीच पाहिजे अशी ही निवडणूक,काय महत्त्वाचे??.सरकार व्यक्त होईल मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे..जे न्यायिक विषय हाताळत आहेत त्यांनी पुढील दिशा वा मार्ग विषयांवर प्रकाश टाकावा..आरक्षण मात्र वाचवावे !" असं त्यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !