युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत दिड लाखाची चोरी

 घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी



परळी वै.ता.२ प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या अयोध्या नगर येथे घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यांनी एक लाख त्र्येपन्न हजार रूपयाचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना शनिवारी (ता.२) सकाळी निष्पन्न झाली.

     जिरेवाडी रोडवर असलेल्या अयोध्या नगर येथील प्रदिप देवराव दराडे (वय-२९) यांचे घर आहे. मागील दोन दिवस घरी कुणीच नव्हते. घराला कुलुप असल्याची संधी साधत चोरटयांनी गॅस कटरच्या सहाय्याने कुलुप व कोंडा तोडुन घरात प्रवेश करून घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करून दोन कपाट तोडुन त्यातील साहीत्य लंपास केले. चोरटयांनी सोने व नगदी रोख रकमेसह पितळेचे भांडे चोरून नेले आहेत. दराडे यांच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी तीन तोळे वजनाचे पट्टा गंठण, पाच ग्रॅम वजणाची सोन्याची अंगठी, दोन ग्रॅम वजनाचे कानातली सोन्याची बाली, तांबा पितळेची दोन घागरी व तीन भांडी व नगदी २८ हजार असे एकुण १ लाख ५३ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.


या प्रकरणी प्रदिप देवराव दराडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गु.रं.न १४६/२०२२ कलम ३८०, ४५४, ४५७ भादवीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांनी भेटी दिल्या. या प्रकरणी पुढील तपास ठाण्याचे सपोनि सपकाळ हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या