इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-बीड जिल्ह्यात पोळा व चंपाषष्ठीला शासकीय सुट्टी

 बीड जिल्ह्यात पोळा व चंपाषष्ठीला शासकीय सुट्टी 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या स्थानिक सुट्ट्यांबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी परिपत्रक काढले असून यानुसार बीड जिल्ह्यामध्ये पोळ्याला व चंपाषष्ठीला स्थानिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

     बीडचे जिल्हाधिकारी राधावबिनोद शर्मा यांच्या स्वाक्षरीने नुकतेच स्थानिक शासकीय सुट्ट्या बाबत चे परिपत्रक काढण्यात आले आहे. यानुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकार कक्षेत सन 2022 या वर्षातील दोन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत .यामध्ये दिनांक 26 ऑगस्ट2022 रोजी पोळा हा सण असून या दिवशी शासकीय सुट्टी आहे. तर चंपाषष्ठी दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी असून या दिवशीही स्थानिक शासकीय  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या