MB NEWS-तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना:जाळीला चिटकून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना:जाळीला चिटकून एका  तरुण शेतकऱ्याचा मृत्यू



बीड - जिल्ह्यात तीन दिवसात दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. रानडुकराच्या बचावासाठी बागेला लावलेल्या संरक्षण जाळीला चिटकून एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू आज दि.29 पहाटे झाला.ही घटना आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घडली.
           आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे घराच्या काही अंतराला लागुनच डाळिंब बाग आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्या बागेला रानडुक्करांपासुन बचाव व्हावा म्हणून संरक्षण जाळीला विद्युत प्रवाह सोडला होता. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल माणिक नरवडे (वय 30 वर्ष) हा बागेची पाहणी करण्यासाठी गेला होता. पण विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरल्याने त्याला जीव गमवावा लागला. विद्युत प्रवाह असलेल्या संरक्षण जाळीला चिटकून त्याचा दुर्देवी मुत्यु झाला. त्याच्या मुत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांत ही दुसरी घटना जिल्ह्यात घडली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !