MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचं सूचक ट्विट

 पंकजाताई मुंडे यांचं सूचक ट्विट



ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत ; ओबीसींचे अभिनंदन अन् सरकारचे आभार


मुंबई  ।दिनांक १४।

नगरपरिषदांच्या निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सूचक ट्विट केलं आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

Click &Read:*न.प.निवडणुक कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडून स्थगिती*

   राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला होता. या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी भाजपनं लावून धरली होती शिवाय राज्य सरकारनेही तशी भूमिका मांडली होती.


   निवडणुक आयोगाने आज एक आदेश काढून या निवडणुका स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत ओबीसींच्या आरक्षणाशिवाय हया निवडणुका होणार नाहीत असं म्हटलं आहे, त्याचबरोबर निवडणुक स्थगित झाल्याबद्दल त्यांनी ओबीसींचे अभिनंदन करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार